💥परभणी मनपा हद्द लगतच्या पाच किलोमिटर परिसरासह जिल्ह्यातील सहा तालुक्यात संचारबंदीत वाढ....!




💥जिल्हा प्रशासनाचे आदेश; जिल्ह्यातील पुर्णा-पालम-गंगाखेड-पाथरी-मानवत-सेलूत राहणार पुन्हा ३ दिवस संचारबंदी💥

परभणी (दि.०५ जुले) - जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्याने जिल्हा प्रशासन कमालीचे सतर्क झाले असून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील परभणी मनपा हद्द तसेच पाच किलोमीटर परिसरासह पुर्णा-पालम-गंगाखेड-पाथरी-मानवत-सेलू आदी सहा तालुक्यातील नगर पालिका तसेच नगर पंचायत हद्दीत दि.०६ जुलै २०२० चे मध्यरात्री १२-० वाजेपासून ते दि.०८ जुलै २०२० मध्यरात्री पर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आहे


जिल्ह्यात कोरोना बाधीतांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असली तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि संसर्गजन्य आजाराचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पुन्हा संचारबंदी मध्ये वाढ करण्यात आली असल्याने नागरिकांनी शासकीय निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सन्माननीय जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी दिले असून संपूर्ण संचारबंदी जारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले आहेत...

💥सेलूत करोना बाधित रुग्ण आढळला💥

परभणी : सेलू येथील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखेतील एक कर्मचारी रविवारी प्राप्त अहवालाप्रमाणे करोना बाधित आढळला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ती शाखा 6 जुलै ते 8 जुलै पर्यंत बँक बंद ठेवण्याचे आदेश बजावले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या