💥नांदेडमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्याकडून २२ हजार ७०० रुपये दंड वसुल...!



💥सहा.आयुक्त संजय जाधव,डाॅ.मिर्झा फरतुल्ला बेग, प्रकाश गच्चे,अविनाश अटकोरे व त्यांचे पथकाने केली कार्यवाही💥 

नांदेड दि.१८ जुलै) - नांदेड महानगरपालिकेच्या कोरोना नियंत्रण पथकाने 19 जुलै क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने क्षे.का.क्र. 1 तरोडा सांगवी अंतर्गत (4) चिकन शाॅप चालू असल्याने प्रत्येकी 1000/प्रमाणे रु.4हजार व मास्क न लावल्याने रु.900/,क्षे.का.क्र.अशोक नगर अंतर्गत संचारबंदी काळात स्थापन केलेले पथक क्र 3,4ने (5)मटन शाॅप कडुन रु 12हजार,पथक क्र. 4 वजीराबाद ने मास्क लावल्याने रु.2हजार 800/,पथक क्र. 9 ने (1)बेकरी ,(1) अंडा शाॅप यांच्या कडुन रु.3 हजार, असा एकुण रु.22 हजार 700/चा दंड वसूल करण्यात आला.

आयुक्त डाॅ सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विलास भोसीकर, उपायुक्त सुधिर इंगोले यांच्या नियंत्रणाखाली सहा.आयुक्त संजय जाधव, डाॅ. मिर्झा फरतुल्ला बेग, प्रकाश गच्चे, अविनाश अटकोरे व त्यांचे पथकाने ही कार्यवाही केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या