💥महापुरावर मात करण्याबाबत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमधील मंत्र्यांची मुंबईत झाली बैठक..!💥महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री श्री जयंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली झाली बैठक💥

मुंबई (दि.०८ जुलै)  -मागील वर्षी कोल्हापूर सांगली व सातारा या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी मूळे महापूर आलेला होता व काही ठिकाणी जिवीतहानी तर मोठ्य प्रमाणावर मालमत्तेची हानी झालेली होती. जनतेचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील अनेक भागात यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. एकाच वेळी पडलेला पाऊस व अलमट्टी धरणातून वेळीच पाण्याचा न झालेला विसर्ग याला कारणीभूत आहे असा समज निर्माण झालेला होता. दोन्ही राज्यात नुकसानीचे प्रमाण जास्त असले तरी अधिकारी स्तरावर समन्वय असता आणि दोन्ही राज्यातील प्राधिकरण यांनी वेळीच चर्चा केली असती तर नुकसान टाळता आले असते अशी जनभावना निर्माण झाली होती, याचाच भाग म्हणून  यावेळी मान्सून च्या काळात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी आज महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर  महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री श्री जयंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली दोन्ही राज्याचे मंत्री सचिव व जलसंपदा खात्याचे प्रमुख  अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. 


या बैठकीस कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी, मंत्री श्रीमंत पाटील, महेशकुमार कुमटल्ली, स्लम बोर्ड अध्यक्ष राकेश सिंग अपर मुख्य सचिव जलसंपदा कर्नाटक हे उपस्थित होते. महाराष्ट्राच्या वतीने जयंत पाटील जलसंपदा मंत्री, बाळासाहेब पाटील सहकार मंत्री, राजेंद्र पाटील यड्रावकर राज्यमंत्री आरोग्य व वैद्यकीय शिक्षण, बंटी पाटील राज्यमंत्री गृह शहरे , विश्वजित कदम राज्यमंत्री कृषी ,संजयकाका पाटील खासदार
धैर्यशील माने खासदार, राजेश पाटील आमदार  हजर होते. जलसंपदा विभागाचे सचिव म्हणून श्री प्रवीणसिंह परदेशी यांनी प्रस्ताविक केले व राज्याची भूमिका मांडली. बैठकीत मंत्री स्तरावरची एक समिती आवश्यकतेनुसार पूर परिस्थिती चा वेळोवेळी आढावा घेईल असे सुचविण्यात आले.

सचिव स्तरावरील समिती चर्चा करून महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील कृष्णा नदीवरील व प्रणालीतील इतर नद्यांच्या व पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणाचा अभ्यास करून निर्णय घेईल. तसेच महाराष्ट्र व कर्नाटक मधील पुरामुळे बाधित होणाऱ्या जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी स्तरावर समन्वय राखला जावा,अधीक्षक अभियंता स्तरावरील समिती दररोज पडणारा पाऊस व नदी आणि धरणातील पाण्याचा विसर्ग यावर लक्ष ठेवेल.  असे समन्वय राखणारे निर्णय घेण्यात आले. 

काही भागात पाण्याचा अभाव ही परस्परविरोधी परिस्थिती असल्याने यावर दोन्ही बाजूचे अधिकारी यांनी बैठक घेऊन उपाययोजना सुचवाव्यात असे निर्देश मा जयंत पाटील यांनी यावेळी दिले. चंदगड तालुक्यामधील सुपीक जमीन पाण्याखाली जाते याबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी सूचना चंदगड विभागाचे आमदार राजेश पाटील यांनी केली तर जत या दुष्काळी भागाला किमान दोन टीएमसी पाणी द्यावे अशी मागणी जत विभागाचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी या बैठकीत केली, कर्नाटक राज्यासोबत असलेले पाण्यासंदर्भी वाद सामोपचाराने सोडवण्यावर भर द्यावा व महाराष्ट्राचा जो पाण्याचा हिस्सा आहे तो कर्नाटक राज्याने देण्याबाबत त्वरित उपाययोजना कराव्या असे चर्चेदरम्यान ठरले.

यासंबधी कोर्ट केसेस व प्राधिकरणात असलेल्या दाव्यांवर चर्चा करण्यात आली. जत तालुका सातारा ला कर्नाटक राज्याने देवाणघेवाण पद्धतीने पाणी द्यावे यावर सुद्धा चर्चा झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या