💥परभणीत शहरात आज शुक्रवारी पुन्हा आढळले कोरोनाबाधित २ रुग्ण...!💥जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 200 च्या वर गेली आहे💥

परभणी (दि.१० जुलै) - शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेदिवस वाढ होत असून आज शुक्रवार दि.१० जुलै रोजी दुपारी सेलू शहरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यापाठोपाठ परभणी शहरातील जवाहर कॉलनी व धार रस्त्यावरील आनंद नगरात प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. धार रस्त्यावरील व्यक्ती ३४ वर्षीय असून जवाहर कॉलनीतील व्यक्ती डॉक्टर असल्याची माहिती हाती आली आहे. 
दरम्यान, जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २०० च्या वर गेली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या