💥परभणी जिल्ह्यात आज गुरुवारी आढळले ३ कोरोना बाधीत रुग्ण.....!💥शहरात २ तर जितूर येथे आढळला शहरातील व तिसरा कोरोना बाधीत रुग्ण💥

परभणी (दि.०९ जुलै) - जिल्ह्यात कोरोनाची घौडदौड सातत्याने चालूच असून आजृ सकाळ पासून शहरातील २ रुग्णांसह जिंतूर येथील १ अश्या ३ कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे.  

जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेदिवस शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पसरत असून आज गुरूवार दि.०९ सकाळी प्राप्त अहवालानुसार आणखीन ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दोन शहरातील व तिसरा जिंतूरात आढळून आला आहे.


परभणीतील प्रयोगशाळेत संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले त्यातून गांधीपार्क भागातील ३३ वर्षीय पुरुष तसेच सोनार गल्लीतील ६० वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळल्या असून सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील ४५ वर्षीय पुरुष जिंतुरात बाधित आढळून आला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या