💥परभणी शहरात पुन्हा आढळले २ कोरोना बाधीत रुग्ण....!


💥आज शुक्रवारी दिवसभरात आढळले ९ रुग्ण,जिल्ह्यात रुग्ण संख्या १३१ उपचारा नंतर ४ जणांची घरवापसी💥

पूर्णा (दि.०३ जुलै) - परभणी शहराच्या विविध भागात शुक्रवारी ३ रोजी सायं ४ वाजण्याच्या सुमारास ६ रुग्ण आढळून आले होते.तर मानवत तालुक्यातील ईरळद येथिल एक कोरोना बाधीत असल्याचा अवहाल प्रशासनास प्राप्त झाला होता.यानंतर जिल्हा प्रशासनास रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अवहालानुसार परभणी शहरातील काद्राबाद प्लाॅट येथिल कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोन महीलांचा पाॅझीटीव्ह  अवहाल प्रशासनास प्राप्त झाला असल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा १३१ वर‌ पोहचला आहे.


         जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार दोन रुग्ण हे शहरातील काद्राबाद प्लाट वसाहतीतील ४६ व २६ वर्षीय महीला आहेत.त्या दोघी त्यांच्या घरातील कोरोना बाधीत व्यक्तींच्या जवळून संपर्कात आलेल्या असल्याचे समजते.  त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत  त्यांची प्रकृती स्थिर आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या