💥परभणी शहरासह जिल्ह्यात आज आढळले १० कोरोना बाधीत रुग्ण...!


💥शहरातील ७ रुग्णांसह पूर्णा व पाथरी तालुक्यातील प्रत्येकी १ करोना बाधित रुग्णांचा समावेश💥 

परभणी (दि.४ जुलै) जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप सातत्याने वाढतांना दिसत असून जिल्हा प्रशासनाच्या सतर्कते नंतर ही बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांचे लोंढे थांबत नसल्यानेकोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस जोमाने वाढतांना दिसत आहे आज शनिवार दि.०४ जुलै रोजी परभणी शहरासह जिल्ह्यात १० कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून पुर्णा तालुक्यातील महागाव येथील १ व पाथरी शहरातील एकता नगर पाथरी १ कोरोना बाधीत रुग्णासह परभणी शहरातील महात्मा फुले कॉलनी १,जवाहर कॉलनी १ करडगाव १,भव नगर १,गणेश नगर १,गंगापुत्र कॉलनी ३ अश्या एकुण १० रूग्णांचा समावेश असून आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या १३९ एवढी झाली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या