💥नांदेडला ११ पॉझिटिव्ह आढळले; रुग्ण संख्या ५६९....!
💥त्या दोन रुग्णांचा गुरुवारीच मृत्यू मुदखेडमध्ये आणखी तीन रुग्ण आढळले💥

नांदेड (दि.११जुलै ): शनिवारी सकाळी आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नांदेड जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ५६९ तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८४ झाली आहे.

नांदेड व भोकर येथील एका पुरुष (वय २८) व महिला (वय ३३) अशा दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील बाधितांच्या मृत्यूची संख्या २७ झाली आहे. या आधी जिल्ह्यातील बाधित रुग्णांमध्ये ५० वर्षा पलीकडील गंभीर अवस्थेतील रुग्णांचा समावेश होता. परंतु आता तरुण वयातील रुग्ण दगावण्यास सुरुवात झाली आहे.


भोकर येथील ३३ वर्षीय महिला ३ जुलै रोजी उपचारासाठी दाखल झाली होती. तिचा अहवाल सात सहा दिवसांनी, दि.९ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान तिचे निधन झाले. बळीरामपूर, दूध डेअरी जवळ येथील २८ वर्षीय युवकाचा उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही तासातच दि.९ जुलै रोजी मृत्यू झाला. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांच्या पॉझिटिव्ह अहवाल व मृत्यूची माहिती प्रशासनाने शनिवार, दि.११ जुलै रोजी जाहीर केली आहे.

शनिवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार, नागणी, बिलोली (पुरुष, वय ३०), कुंडलवाडी (पुरुष, वय २६), वजिराबाद, नांदेड (पुरुष, वय ६४), तेली गल्ली, गांधी चौक, भोकर (महिला, वय ३३), देगलुर, वाल्मिकी नगर (पुरुष, वय ४४), नगरपालिकेच्या जवळ, मुदखेड (महिला, वय ३० व ४५), बाजार मोहल्ला, मुदखेड (पुरुष, वय ४०), बळीरामपूर दूध डेअरी, नांदेड (पुरुष, वय २८), भायेगाव, देगलूर (पुरुष, वय ३६), टायर रोड, नांदेड (पुरुष, वय ३२).

💥दोन दिवस माहिती लपविली ?💥

*प्रशासनाने माध्यमांना पाठवलेल्या माहितीतील ज्या दोन्ही रुग्णाचा मृत्यू झाला, त्यांचे अहवाल गुरुवारीच (दि.९) पॉझिटिव्ह आले होते. तसेच त्यांचा मृत्यूही गुरुवारीच झाला. त्यामुळे त्याची माहिती गुरुवारच्या किंवा फारतर शुक्रवारच्या प्रेस नोटमध्ये देणे अपेक्षित होते. परंतु, मागील दोन्ही दिवसात या रुग्णांच्या अहवाल किंवा मृत्यूची नोंद असल्याचे दर्शवण्यात आले नाही.*

 मात्र, शनिवारी सकाळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या सोशल मीडिया ग्रुपवर याची माहिती देण्यात आली. मागील दोन दिवसांपासून ही माहिती का लपवून ठेवण्यात आली, असा प्रश्न विचारला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या