💥नांदेड जिल्ह्यातील मांडवी पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या पिंपळगांव फाटा येथील तोतया तहसीलदार प्रकरणात २ अटक..!💥मांडवी पोलीसांनी समद फाजलानी व त्‍याचा साथीदार मुसा खान याला केली अटक,गुन्हे दाखल💥


नांदेड (दि.०२ जुलै) जिल्ह्यातील मांडवी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगांव फाटा येथे दि.११ में २०२० रोजी मांडवी पोलीस ठाण्‍याचे पोलीस कर्मचारी नितेश लेनगुरे हे तेलंगाणा राज्‍याच्‍या अदीलाबाद कडुन अंडे भरुन येत असलेल्‍या वाहनाची तपासनी करीत असतांना सारखनी येथील समद फाजलानी याने अंड्याचे वाहन सोडवण्‍यासाठी तोतया तहसीलदार मुसा खान याला फोन करुन वाहन सोडवल्‍या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला असुन मांडवी पोलीसांनी समद फाजलानी व त्‍याचा साथीदार मुसा खान याला अटक केली आहे.

या बाबत सवीस्‍तर वृत्‍त असे कि राज्‍य शासनाने कोरोना संक्रमण रोखण्‍या साठी नाके बंदी चे आदेश जारी केले होते या अनुषंगाने तेलंगाणा व महाराष्ट्र आंतरराज्य नाकेबंदी ,करित असतांना  दि.११ में २०२० रोजी राञी ८ ते ९ वाजताच्‍या सुमारास नांदेड जिल्याच्या  मांडवी पोलीस ठाण्‍याच्‍या पिंपळगांव चेक पाॅइंट वर  तेलंगाणा राज्‍याच्‍या अदीलाबाद कडुन एम.एच.२९ बी.ई.०६११ पिकप वाहनात अंडे भरुन मांडवी,सारखनी कडे जात असतांना करतव्‍यावर असलेले पोलीस कर्मचारी नितेश लेनगुरे,हे वाहनाची तपासनी करीत असतांना वाहनात बसलेल्‍या समद हारुन फाजलानी याने तपासनी करण्‍या पुर्वीच पोलीस कर्मचार्यास हुज्‍जत घालुन आमच्‍या अंड्याच्‍या वाहनाची तुम्‍ही कशी तपासनी करता ? हे जिवन आवश्‍यक  वस्‍तु आहे असे म्‍हनत थेट समद फाजलानी याने आपला साथीदार मुसाखान मश्‍ताकखान याला फोन लावुन त्‍याचा परिचय किनवटचे  तहसीलदार असा देत पोलीस कर्मचार्यास फोनवर बोलायला लावले, व मुसाखान (तोतया तहसीलदार) याने हुबेहु तहसीदार यांच्‍या सारखे बोलुन अंडे भरलेले वाहन सोडायचे आदेश दिले,त्‍यांच्‍या आदेशावरुन पोलीस कर्मचारी नितेश लेनगुरे यांनी ते वाहन सोडुन दिले.

दोन दिवसा नंतर माञ पोलीसा सोबत तोतयगीरी करत समद फाजलानी याने तोतया तहसीदार याला बोलायला लावुन वाहन सोडवले,हि कुन कुन लागताच मांडवी पोलीस ठाण्‍यात नितेश लेनगुरे यांनी रितसर तक्रार दिली व या गंभीर प्रकरणाचा तपास मांडवी पालीस ठाण्‍याचे पोलीस उप निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे यांच्‍या कडे देण्‍यात आला त्‍यांनी या प्रकरणात गांभीर्याने तपास करत अनेक पुरावे गोळा केले वन नाक्‍यावर असलेल्‍या सि.सि.टिव्‍ही फुटेज ची सुद्धा पाहनी केली व किनवट चे तत्कालीन तहसीलदार नरेंद्र देशमुख यांचा लेखी जबाब सुद्धा नोंदवुन घेतला  व बारकाईने तपास करत वरिष्‍ठांच्‍या मार्गदर्शनाखाली तब्‍बल ४९ दिवसा नंतर मांडवी पोलीस ठाण्‍यात समद हारुन फाजलानी,व तोतया तहसीलदार मुसाखान मुश्‍ताक खान पठान यांच्‍या विरोधात दि.२९ जुन रोजी गु.र.न.५५/२०२०,४१९,५००, ३४ नुसार गुन्‍हा दाखल केला तसेच दि.२९ जुन रोजी सारखनी येथे सापळा रचुन मांडवी पोलीसांनी समद फाजलानी याला अटक केली असुन ३० जुन रोजी मुसा खान याला सुद्धा ताब्‍यात घेतले या कार्यवाहीत स्‍वताह मांडवी पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस नीरीक्षक संतोष केंद्रे, पोलीस उप निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे, पोलीस कर्मचारी वैजयनाथ मोटरंगे,शाम चव्‍हान,पोलीस नाईक शाम नागरगोजे,पोलीस कॉनीस्‍टेबल जाधव, व जिप चालक यांनी आरोपींना अटक करण्‍यासाठी परिश्रम घेतले.       

समद फाजलानी याचा मागील ईतीहास हा गुन्‍हेगारीचा असुन सन २०१४ मध्‍ये यवतमाळ जिल्‍याच्‍या दारव्‍हा पोलीस ठाण्‍यात गु.र.न.२८/२०१४ कलम ३७९/३४ नुसार गुन्‍हा दाखल असुन प्रकरण न्‍याय प्रवीष्‍ठ आहे.तर मुसा खान हा सुद्धा गुन्‍हेगारी वृत्‍तीचा असुन त्‍याच्‍यावर दि.३/१/२०१७ रोजी किनवट पोलीस ठाण्‍यात कलम ३९५,४२७,३२३,५०४,५०६ भादवी प्रमाणे गुन्‍हा दाखल असुन प्रकरण न्‍याय प्रवीष्‍ठ आहे.

समद फाजलानी व मुसाखान याला अंड्याच्‍या वाहनाला सोडवण्‍यासाठी चक्‍क तहसीलदार तथा दंडाधीकारी यांच्‍या नावाचे वापर करण्‍यामागचे उद्देश काय होते असे करुन त्‍यांनी या पुर्वी अवैध गुठका,किंवा जंगलातील मौल्‍यवान सागवान यांची अवैध तस्‍करी तर केली नाही ना ? हा एक संशोधनाचा विषय असुन चौकशीचा भाग आहे. माञ या कार्यवाहीने समद फाजलानी व नेतेगीरी करु पाहनार्या मुसाखान यांची छवी जनते समोर आली असुन गोड बोलुन जनतेची फसवणुक करनार्या या टोळीचे धाबे दनानले आहे हे माञ तेवढेच खरे,मांडवी पोलीसांच्‍या या धाडस कार्यवाहीने जनतेत समाधान व्यक्त  केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या