💥पुर्णेत अजब संचारबंदी; ग्रामीण भागातील भाजीपाला उत्पादक विक्रेते हद्दपार ? हातगाडे वाल्यांचा मात्र सर्वत्र मुक्तसंचार...!



💥ना मास्क,ना सामाजिक अंतर ? हातगाडे चालक शहरात फिरताय निरंतर ? जिल्हा प्रशासनाचे आदेशाला मुठमाती💥

परभणी/पुर्णा (दि. जुलै) -जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू नयें याकरिता जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिपक मुगळीकर हे विशेष खबरदारी घेत असून त्यांनी तश्या खबरदारी घेण्याच्या सुचना त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.विशेष खबरदारी घेतल्यानंतर ही जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढतच असल्यामुळे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी जिल्ह्यात दि.१५ जुलै मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लागू केलेल्या संचारबंदीस पुन्हा वाढ करून शुक्रवार दि.१७ जुलै २०२० पर्यंत मुदतवाढ बहाल केली या संचारबंदी काळात रुग्णालय मेडिकल स्टोअर अर्थात औषधी दुकान वगळता सर्वकाही बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले असतांना मात्र जिल्ह्यातील


पुर्णा शहर परिसरात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांना सोईस्कररित्या बगल देऊन ग्रामीण भागातील भाजीपाला उत्पादक शेतकरी तसेच भाजीपाला विक्रेत्यांची मुस्कटदाबी केलीजात असल्याने शहरी भागातील हातगाड्यावरील भाजी विक्रेत्यांना वेगळा आणि ग्रामीण भागातील गोरगरीब भाजीपाला उत्पादक/भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्यांना वेगळा कायदा लागु करण्यात आला की काय ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होतांना दिसत आहे.


पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातल्या अनेक गावांतून भाजीपाला व फळ उत्पादक शेतकरी शहरात भाजीपाला व फळ विक्रीसाठी येत असतात परंतु संचारबंदी असल्याचे कारणामुळे त्यांना भाजीपाला फळ विक्रीस मज्जाव होत असल्याने त्यांना आपला भाजीपाला सडून खराब होऊ नयें याकरिता मातीमोल किंमतीत शहरातील हातगाडे चालक स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री करावा लागतो व हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून मातीमोल किंमतीत घेतलेला भाजीपाला संबंधित हातगाडे चालक कोरोना व्हायरस (कोविड -१९) या जागतिक महामारीच्या काळात प्रशासकीय आदेशाचे उल्लंघन करीत आपत्ती व्यवस्थापण कायदा तसेच साथी रोग प्रतिबंधक अधिनियम कायदा लागू असतांना ही शहरातील प्रत्येक परिसरात जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्या आदेशाची अवज्ञा करीत तोंडावर कुठलेही मास्क न लावता सामाजिक अंतर न ठेवता शहरात सर्वत्र बिनधास्त मुक्तसंचार करीत भाजीपाला-फळांची विक्री करत फिरत असतांना दिसुनही स्थानिक प्रशासन मात्र जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची राजरोसपणे अवज्ञा करणाऱ्यांना का पाठीशी घालत आहे ? या प्रश्नाचे उत्तर देणार तरी कोण ?


पुर्णा शहरात ग्रामीण भागातील पाजीपाला उत्पादक शेतकरी आणी भाजीपाला विक्रेत्यांची अवस्था 'धन्याला धत्तुरा अन् चोराला मलीदा' या उक्ती प्रमाणे झाल्याचे निदर्शनास येत असून त्यांच्या पदरात लॉकडाऊन काळात आणी अनलॉकडाऊन काळातही हेळसांडच येत असल्याचे दिसत असून अनलॉकडाऊन काळात भाजी पाल्याच्या बाजार गावाबाहेर तब्बल जवळपास एक किलोमीटर अंतरावरील बसस्थानकात भरवण्यात येत असल्याने व या बसस्थानकात पावसा मुळे चिखल-पाणी साचत असल्या कारणाने शहरातील जनता भाजीपाला फळ खरेदी करण्यासाठी बसस्थानकाकडे जाण्यास धजावत नसल्याने ग्रामीण भागातील भाजीपाला फळांची विक्री करणाऱ्या विक्रेत्या अक्षरशः आपला भाजीपाला व फळ फेकून देण्याची वेळ येत आहे


तर त्याऊलट हातगाड्यावर भाजीपाला व फळांची विक्री करणारे असंख्य फिरस्ती हातगाडेचालक शहरातील विविध भागात मनमानी दराने भाजीपाला व फळांची विक्री करीत असंख्य लोकांच्या संपर्कात येऊन जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांची अवज्ञा करीत सोबत कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाला ही निमंत्रण देत असल्याचे दिसत असून असतांना स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाही या गंभीर बाबीकडे सपशेल दुर्लक्ष करून जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्या आदेशाची दस्तुरखुद्द अवज्ञा करतांना पाहावयास मिळत आहे.


💥ग्रामीण भागातील भाजीपाला विक्रेत्यांवर दंडेलशाही अन् शहरातील हातगाडे चालक भाजीपाला विक्रेते मात्र भाई ?💥

तालुक्यातील ग्रामीण भागातल्या अनेक गावांतून शेतातील उत्पादीत केलेला भाजीपाला शहरात विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना,रुग्णालयात उपचार कामी येणाऱ्या नागरिकांना  कायद्याचा बडगा दाखवून त्यांच्यावर दंडेलशाही करणाऱ्या स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासनातील अधिकारी आणी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी समजून घेण्या ऐवजी त्यांना काठीचा प्रसाद देण्याचे त्यांची वाहन जप्त करुण मनमानी दंड आकारणीचे अनेक प्रकरण समोर येत असून शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची राजरोसपणे पायमल्ली करीत तोंडाला मास्क न लावता सामाजिक अंतर न ठेवता मनमानी दराने भाजीपाला फळांची विक्री करणाऱ्यांना मात्र सर्वत्र मनमोकळे पणाने हिंडण्याची सुट दिली की काय ? ग्रामीण भागातील जनतेला एक कायदा आणी शहरातील लोकांना एक कायदा आहे की काय ?

💥जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज...


तालुक्यातील या परिस्थितीकडे जिल्हाधिकारी दिपक मुगळीर यांनी स्वतः लक्ष देण्याची आवश्यकता असून लॉकडाऊन व संचारबंदीत सुट दिल्यानंतर शहराबाहेरील भाजीपाला बाजार शहरातील पुर्वीच्याच ठिकाणी जुना मोंढा परिसरात आणून संबंधित भाजीपाला विक्रेत्यांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार मार्काऊट करुण देण्याचे आदेश पुर्णा नगर परिषद प्रशासनाला द्यावेत अशी मागणी होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या