💥परभणी जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली १५६..!💥शासकीय जिल्हा रुग्णालयात ५४ कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू💥 परभणी (दि.७ जुलै) जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून आज मंगळवार दि.०७ जुलै रोजी परभणी शहरातील गुलामअली नगरातील ६० वर्षीय महिला तसेच गंगापूत्र कॉलनीतील ४५ वर्षीय व्यक्ती तसेच सेलू शहरातील शास्त्री नगरातील ३० वर्षीय व्यक्ती,मोंढा परिसरातील ५६ वर्षीय महिला तसेच तालुक्यातील रवळगाव येथील २९ वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळले असून त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १५६ एवढी झाली आहे. 
परभणी येथील गंगापुत्र कॉलनीतील व्यक्ती बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या