💥परभणी जिल्ह्यात १८ कोरोना बाधीत रुग्ण झाले कोरोनामुक्त ....!💥जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची एकून संख्या २९०💥

परभणी (दि.१४ जुलै) - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षात उपचार घेत असलेले एकूण १८ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालय प्रशासनाने आज मंगळवार दि.१४ जुलै रोजी सर्व औपचारिकता पूर्ण करीत या रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली.


 त्यात शहरातील विकास नगरातील ४० वर्षीय पुरूष, वैभव नगरातील ३२ वर्षीय पुरूष,काद्राबाद प्लॉटवरील २५ व २६ वर्षीय महिला, पंचशील नगरातील २७ वर्षीय पुरूष अजिंक्य नगरातील ३९ वर्षीय पुरूष,गंगापूत्र कॉलनीतील ५९ वर्षीय महिला २५,३४ वर्षीय पुरूष, जवाहर कॉलनीतील ३४ वर्षीय पुरूष, गणेश नगरातील ३० वर्षीय महिला तसेच झरीतील ७५ व २८ वर्षीय महिला, ४३ व ४५ वर्षीय पुरूष,करडगावातील २१ वर्षीय पुरूष व महागावातील २९ वर्षीय पुरूष असे एकूण १७ रुग्ण तसेच मानवत तालुक्यातील मौजे इरळद येथील ३१ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.आज मंगळवारी दिवसभरात परभणी शहरातील दर्गा रोडवरील ६२ वर्षीय, मुमताज नगरातील ५० वर्षीय पुरूष तसेच जुना पेडगाव रोडवरील ४६ वर्षीय महिला बाधित आढळून आली. सोनपेठ तालुक्यातील भिसेगाव येथील ३५ वर्षीय महिला, पाथरी तालुक्यातील कानसूर येथील २२ वर्षीय तरूण, वालूर येथील २५ व २८ वर्षीय तरूण व जिंतूर तालुक्यातील २५ वर्षीय तरूण असे एकूण ८ व्यक्ती बाधित आढळून आले आहेत. गंगाखेड येथील संख्या कळाली नाही....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या