💥पुर्णेकरांनो सावधान;शहरात मिळाले आज पुन्हा ६ कोरोना बाधीत रुग्ण...!



💥शहरातील शास्त्रीनगर,रेल्वे क्वॉर्टर,आनंद नगरात आढळले पुन्हा ६ कोरोना बाधीत रुग्ण💥

परभणी (दि.२८ जुलै) - जिल्ह्यातील गंगाखेड पाठोपाठ आता पुर्णा तालुक्यातही कोरोना विषाणूंच्या प्रकोपाला सुरूवात झाल्याचे निदर्शनास येत असून कोरोनाने आतापर्यंत शहरातील तिघांचा बळी घेतल्यानंतर ही शहरासह तालुक्यातील नागरिक अद्यापही सतर्क झाल्याचे दिसत नसून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन होत नसल्यामुळे येणाऱ्या अल्पकालावधीतच पूर्णेची अवस्था गंगाखेड प्रमाणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आज मंगळवार दि.२८ जुलै रोजी कोरोना विषाणूंनी पुर्णेकरांच्या असतर्कता आणी गाफीलतेला जंगी सलामी देत शहरातील तब्बल सहा लोकांवर कोरोना बाधीततेचा शिक्का मोर्तब केला असून यात शास्त्रीनगर,रेल्वे क्वॉर्टर,आनंद नगर या परिसरातील एकून ६ कोरोना बाधीत रुग्णांचा समावेश आहे. 


तालुक्यात मागील दिड महीन्यात तालुक्यातील माटेगांव,महागांव,पुर्णा,धानोरा काळे,येथे रुग्ण आढळून आले होते त्या सर्वांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत कोरोनावर मात करून घरी परतले होते.दरम्यान मागील आठवड्यात रेल्वे काॅलनी, आनंदनगर, शास्त्रीनगर, कुरेशी मोहल्ला येथिल तीघांचे अवहाल पाॅझीटीव्ह आल्यानंतर त्यांच्या वर उपचार सुरू झाले होते.शहरातील शास्त्रीनगर तसेच कुरेशी मोहल्ला पाठोपाठ महाविर नगर परिसरात अनुक्रमे ६१ व ५४ व ५२ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णांच्या मृत्यू झाल्याने शहरात भितीचे वातावरण असले तरीही शहरासह परिसरातील नागरिकांना या महामारीच्या प्रकोपाचे गांभीर्य अद्यापही कळाले नसल्याचे निदर्शनास येत असून स्थानिक पातळीवर प्रशासनालाही या कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य नसल्याचेच दिसत आहेत.
शहरातील ज्या परिसरात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले त्या परिसरांना प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर सदरील परिसरांना संपुर्णतः सिल करणे आवश्यक असतांना शहरातील या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिक सर्वत्र मुक्तसंचार करतांना तर शहरातील अन्य परिसरातील नागरिक या प्रतिबंधीत क्षेत्रात बिनधास्त वावरतांना दिसत असतांना मात्र प्रशासन बघ्याची भुमिका घेतांना पाहावयास मिळत असून शहरात भाजीपाला फळ विक्रेते तोंडावर मास्क न वापरता सामाजिक अंतराच्या नियमांची पायमल्ली करीत सर्वत्र फिरत असतांना नगर परिषद प्रशासन पोलीस प्रशासन तहसिल प्रशासन मात्र अक्षरशः डोळेझाक करीत असल्याचे दिसत असल्याचे पाहावयास मिळत असून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या आदेशाची अवज्ञा करण्यात जितके नागरिक जवाबदार आहेत तेवढेच स्थानिक प्रशासनही जवाबदार आहे असे म्हणने यत्किंचितही चुकीचे ठरणार नाही... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या