💥डाकूपिंप्री गोदावरी नदी पात्रातून राजरोस पणे दिवसा होतोय बेसूमारपणे अवैद्य वाळू ऊपसा...💥महसुल प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांचा सहभाग असल्याची चर्चा💥.

प्रतिनिधी

पाथरी:-कोरोनाच्या संकटा मुळे शासनाने मार्च पासून लॉकडाऊन केल्याने या वर्षी शासनाच्या वतीने वाळूघाटांचा लिलाव केला नाही. या कारणाने प्रचंड वाळू टंचाई जानवत असल्याने याच संधीचा फायदा घेत वाळू तस्कर गोदा काठावर राजरोस पणे दिवसा आणि रात्री सक्रीय झाले असुन डाकूपिंप्री सह अनेक ठिकाणच्या वाळू घाटावरून राजरोस पणे अवैद्यरीत्या वाळूची तस्करी करत दहा हजार रुपये प्रती ब्रास प्रमणे विक्री करत असल्याचे सांगितले जात आहे.यात प्रशासनातील बड्या माशांचेही हात असल्याची चर्चा वाळूघाटांच्या गावातील नागरीक करत आहेत.

या वर्षी बंद मुळे वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला नाही. परिणामी बांधकाम क्षेत्रात काम करणा-या मजूरांवर मोठ्या प्रमाणात उपाॊमारीची वेळ आली आहे. वाळूच नसेल तर विट,गज,गीट्टी यांचा उपयोग नाही. लिलाव न झाल्याची संधी साधत गोदावरी नदी काठावरील घाट असलेल्या गावातील चार दोघांना हातशी धरत वाळू तस्कर राजरोस पणे दिवसा आणि रात्री राजरोस पणे बेसूमार वाळूचा उपसा करत बांधकाम सुरू असलेल्या गरजुंना प्रती ब्राॅस दहा हजार रुपयांनी विक्री करत आहेत. नदी पात्रातून ट्रॅक्टरच्या साह्याने ही रेती नदी पात्रा बाहेर आणली जात आहे. एका ठिकाणी साठवनुक करत रात्रीच्या वेळी ट्रक,हायवा या मध्ये भरून तीन ब्रास ची गाडी पंचेचाळीस हजार तर सहा ब्रॉ सचा हायवा ७५ हजारांना विक्री होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या कामात महसल विभातील काही मंडळींचे लागेबांधे असल्याचे ग्रामस्थ साांगत आहेत.या मुळे शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसूल बुडला जात असून महसुल विभागाच्या झारीतील शुक्राचार्यांचे मात्र चांगभलं होत आहे. या पुर्वीचे जिल्हाधिकारी पि शिवशंकर हे वाळू तस्करां साठी संताजी-धनाजी होते. रात्री अपरात्री धाडी टाकत थेट कार्यवाही करत वाहने, जेसीबी,पोकलेन जप्त करून गुन्हे दाखल करत मात्र मागील काही महिण्या पासून स्थानिक महसुल च्या कर्मचारी अधिकारी यांना हाताशी धरत तालुक्यातील अनेक गावांतील धक्या वरुन वाळू तस्कर वाळूची तस्करी करत  असल्या चित्र पहावयास मिळत आहेत.वाळघाट असलेल्या डाकूपिंप्री नदी पात्रात भेट दिली असता अक्षरश: जत्रा भरलेली दिसून आली.


💥अशी होते तस्करी-💥

वाळू तस्करांचे आठ दहा जनांचे सिंडीकेट असून यात महसून विभागातील काही महाभाग आहेत असे ग्रामस्थ सांगतात.ही मंडळी अनेक वेळा नदी काठातून वाळू ऊपसा करत तो वर साठवला जात आहे. त्या नंतर या वाळूची तक्रार करून साठा जप्त केल्याचे दाखवले जाते.या नंतर हाच शंभर,पन्नास ब्रास वाळू साठा नाममात्र लिलाव पद्धतीने सिंडीकेट मधीलच एकाच्या नावे घेतला जातो. या नंतर खरी तस्करी सुरू होते. काही पावत्या घेतल्या जातात. लिलाव झालेल्या वाळूच्या ढिगावर नंतर दिवस रात्र नदी पात्रातून बेसुमार पणे वाळू उपसून आणून टाकली जाते. पंन्नास ते शंभर ब्रास वाळूचा लिलाव करून पैसे भरून हजार ब्रास वाळूची तस्करी होते. या नंतर काही काळ पुन्हा तस्कर थेट उपसा करत रात्रीच्या वेळी वाळू विक्री करत आहेत. या साठी ठिकठिकाणी ठिकाणी रोजंदारीवरील खबरे तस्करांना धोक्याची माहिती देत असतात  माहिती. असा प्रकार पाथरी तालूक्याती डाकूपिंप्री,मुदगल अशा अनेक वाळूधक्यावर सुरू असून मानवत तालुक्यातील काही वाळू घाटावर होत असल्याचे नागरीक सांगत आहेत. या बेसूमार पणे अवैद्य उपस्यावर जिल्हाधिकारी केव्हा लक्ष देणार असा सवाल पर्यारण प्रेमी आणि वाळू घाट असलेल्या ग्रामस्थां मधून विचारला जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या