💥राजभवनातील १८ कर्मचारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह...!💥माहिती समोर येताच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी झाले क्वारंटाईन💥

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललाय. काही मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता कोरोना राजभवनात पोहोचला आहे. राजभवनातील 18 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही माहिती समोर येताच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी क्वारंटाईन झाले आहेत.


माहितीनुसार, राज्यपालांच्या निवासस्थानी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. 18 कर्मचारी एकदम कोरोना पॉझिटिव्ह आल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी क्वारंटाईन झाले आहेत. आता राजभवनात कुठल्याही बाहेरील व्यक्तिंना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच पुढील आदेशापर्यंत सर्व बैठका देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या