💥परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मध्ये मागील १२ दिवसांत आढळले ९० कोरोना बाधित रुग्ण...!💥गंगाखेड शहरात २०० पेक्षा अधिक व्यक्ती क्वारंटाईन तर ८० संशयितांचा स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा💥

परभणी (दि.१७ जुलै) जिल्ह्यातील गंगाखेड दि.०६ जुलै २०२० पासून ८६ तर ग्रामीण भागात ४ व्यक्तीं असे मागील १२ दिवसांच्या कालावधीत एकूण ९० व्यक्तीं कोरोनाबाधित आढळून आल्या असल्याची माहिती गंगाखेडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमाकांत बिराजदार यांनी दिली. 


दरम्यान, गंगाखेड शहरात २०० पेक्षा अधिक व्य्क्ती क्वारंटाईन करण्यात आल्या असून ८० संशयितांचा स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा कायम आाहे. गंगाखेड शहरासह तालुक्यात कोरोना विषाणु बाधित असणाऱ्या व्यक्तींची संख्या तासागणिक वाढत आहे. विशेषतः गंगाखेड तालुक्यात दि.०६ जुलैपासून कोरोना विषाणूने अक्षरक्षः थैमान घातले आहे.दि.१३ जुलै पर्यंत एकूण ६९ बाधित रुग्ण आढळून आले होते त्यानंतर दि.१४ व १५ जुलै रोजी रेपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट किट्स संपल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी २५० जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते.याचा अहवाल गुरूवार दि.१६ जुलै रोजी रात्री १०-३० वाजता प्राप्त झाला. त्यात शहरातील १९ व ग्रामीण भागातील २ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या. त्यामुळे शहरासह तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.
शहरातील शेटे गल्ली मधील ९२ वर्षीय वयोवृद्धाचा दि.१६ जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे मोठी अस्वस्थता पसरली आहे. कारण शहराच्या चौहोबाजूने कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत. आणखीनही प्रलंबीत व्यक्तींच्या स्वॅबच्या अहवालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. कोरोना एक कोरोना एवढ्याच विषय शहरासह तालुक्यात चर्चेत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या