उस्मानाबाद येथील २० वर्षीय अभियंता आढळला पाकिस्तानी सिमेवर...!


💥स्मानाबाद पोलीसांचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना💥
उस्मानाबाद । १७ जुलै : उस्मानाबाद शहरातील 20 वर्षीय अभियंता तरुण 11 जून रोजी सकाळी घराबाहेर पडलेला तरुण भारत पाकिस्तान सीमेवर कच्छ (गुजरात) येथे सापडला आहे. त्याच्या कुटूंबीयांनी तो बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार नोंदवली होती. त्यास उस्मानाबाद येथे आणण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. मात्र कारण कांहीही असले तरी देशभर लागू असलेल्या लॉकडाऊन काळात हा तरुण पाकिस्तान सीमेपर्यंत पोचला कासाकाय हा प्रश्न निर्माण झाला आहे.


ही हकीकत पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना समजताच त्यांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पो.ठा. यांना संबंधीत तरुणाचा शोध घेण्यास सांगीतले. त्याच्या सोशल मिडीया वरील वावरची माहिती घेतली. त्याचे तथाकथीत पाकिस्तानी तरुणीशी चॅटींग सुरु असल्याचे व भेटीसाठी ती तरुणी त्याला पाकिस्तानात बोलवत असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान उस्मानाबादच्या खाजा नगर येथील तो रहिवाशी आहे. त्याचे वडील मौलाना आहेत. त्याचे नाव झिशान सिद्दीकी आहे. त्याने उस्मानाबाद ते गुजरातच्या अहमदाबाद पर्यंत प्रवास सायकलवर केला. अहमदाबाद इथून कच्छ पर्यंतचा प्रवास त्याने दुचाकीवरून केला. असा दावा एका खाजगी वृत्तवाहिनीने केला आहे. संबंधित वहिनीने त्या युवकाचे छायाचित्र आणि बीएसएफने जारी केलेली अन्य छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. मात्र अहमदाबाद इथे त्याला दुचाकी काशिकाय मिळाली हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान उस्मानाबाद सायबर विभागाच्या मदतीने त्याच्या मोबाईल फोनची माहिती घेउन त्याचा ठावठिकाणा मिळवला. तो कच्छ (गुजरात) परिसरात असल्याची माहिती मिळाली. ही हकीकत पोलीस अधीक्षक यांनी कच्छ (पुर्व) चे पोलीस अधीक्षक व इतर तपास यंत्रणांना कळवून त्यांच्याशी चर्चा केली. उस्मानाबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीवरुन सर्व यंत्रणा सतर्क झाल्या.
काल गुरुवारी 16 जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास त्याची दुचाकी बीएसएफ च्या गस्ती पथकास आढळली. तर रात्री दहाच्या सुमारास तो बीएसएफ पथकास आढळला. सध्या तो बीएसएफ बटालीयन 150 च्या ताब्यात आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी उस्मानाबाद पोलीसांचे पथक रवाना झाले आहे. असे पोलीस सूत्रांनी कळविले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या