💥परभणी जिल्हा एलसीबीतील ३ पोलीसांना गुन्हेगारी प्रवृत्तीशी हितसंबंध जोपासने आले अंगलट...!💥जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी तिघांना निलंबित करण्याचे काढले आदेश💥

परभणी (दि.२ जुलै) जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कर्तव्यकठोर जिल्हा पोलीस अधिक्षक श्री कृष्णकांत उपाध्याय यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा पदभार स्विकारल्या पासून जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणे गुन्हेगारीवर अंकूश निर्माण झाला असून जिल्ह्याला प्रथमच श्री.उपाध्याय यांच्या रुपाने एक कर्तव्यदक्ष व इमानदार पोलीस अधिकारी लाभल्याचे निदर्शनास येत असून गुन्हेगारी प्रवृत्तीसह अवैध व्यवसायिक तस्करांशी हितसंबंध जोपासनाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही कायद्याचा बडगा दाखवणारा जिगरबाज सिंघम अधिकारी म्हणून श्री उपाध्याय यांच्याकडे बघितले जात आहे कायद्या पेक्षा कोणीही मोठे नसते हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिल्याचे दिसत असून जिल्ह्यातील जिंतूर येथील गून्हेगार व्यक्तीशी हितसंबंध राखल्याबद्दल स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी निलंबित केले आहे.निलंबनाचे आदेश काल बुधवार दि.१ जुलै २०२० रोजी सायंकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयाने हे आदेश काढले आहेत.


जिंतुर येथील सुरेश जैस्वाल नामक अट्टल गुन्हेगारांबरोबर नियमितपणे मोबाइलवर संपर्क, संभाषण करीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गुन्हेगारीचे पाठराखण केल्याबद्दल शरद मुलगिर, विशाल वाघमारे व उध्दव सातपुते या एलसीबीच्या तिघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
या तिघांनी कर्तव्यात, बेकायदेशीर,बेशिस्त, बेजबाबदार, संशयित, विपर्यंस्त, हेकेखोर वर्तणूक केले.नैतिक अंधःपतनाचे गैरवर्तन केल्याचा ठपकाही या आदेशात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान या कार्यवाहीने पोलिस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे.याआधीही या प्रकरणात एका पोलिस अधिका-याविरूध्द जिंतूर पोलिस ठाण्यात गून्हा दाखल झाला. पाठोपाठ  शासकीय सेवेतून बडतर्फही करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या