💥परभणी जिल्ह्यातील त्या कोरोना बाधीत आमदाराच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू...!💥विधीमंडळ सदस्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समर्थकांनी दिली💥

परभणी (दि.१८ जुलै) - औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात आज शनिवार दि.१८ जुलै रोजी सकाळी रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत परभणी जिल्ह्यातील एक विधीमंडळ सदस्य कोरोनाबाधित आढळले असून ते नेमके कोणा बाधिताच्या संपर्कात आले अन् त्यांच्याही संपर्कात कोण-कोण आले आहे, या संदर्भात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाद्वारे आज शनिवारी दुपारपासून शोध मोहिम हाती घेतली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलतांना या मोहिमेबाबत दुुजोरा दिला. विधीमंडळ सदस्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समर्थकांनी दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या