💥पुर्णा शहरातील शास्त्रीनगर परिसरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड...!



💥२२ हजार रुपयांचा मुद्देमालासह ६ जुगारडे पोलीसांच्या ताब्यात💥

पुर्णा (दि.१९ जुलै) - कोरोना व्हायरस या जागतिक महामारीच्या काळातही शहरासह संपूर्ण तालुक्यात जुगार अड्डे,मुंबई-कल्यान मटका,अवैध देशी-विदेशी दारूसह नशील्या पदार्थाची विक्री तसेच अवैध गुटखा तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करीसह विक्री होत असल्याचे  निदर्शनास आल्यानंतर जिल्ह्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी यापुर्वीच सर्वच अवैध धंद्यांच्या विरोधात धडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांना दिल्याचे समजते त्यांच्या आदेशाचे कठोरपणे अंमलबजावणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यातही होतांना दिसत असून पुर्णा पोलीस स्थानकातील सपोनि.प्रविण धुमाळ यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यां विरोधात धडक मोहीम राबवल्याचे दिसत आहे.

 येथिल शास्त्रीनगर परिसरात नगदी पैसे लाऊन जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पुर्णा पोलीसांनी केलेल्या छापेमारीत २२ हजार रुपयांचा मुद्देमालासह ६ पत्तेबहाद्दर ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   
पुर्णा शहरातील शास्त्रीनगर भागातील अब्दुल रज्जाक अब्दुल गनी याच्या राहत्या घरात काही जणं जुगार खेळत असल्याची माहिती पुर्णा पोलिसांना मिळाली यावरुन आज रविवार दि. ‌ १९ जुलै रोजी पुर्णा पोलिसांनी शास्त्रीनगरातील अ.रज्जाक याचे घरावर सायंकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास रेड केली यावेळी त्या घरात पुर्णा पोलिसांना सहा ते सात जण तोंडाला मास्क न बांधता सोशल डिस्टन्सिंग बाबतचे नियम न पाळता अनाधिकृत पणे पत्यावर पैसे लाऊन जुगार खेळत असताना अब्दुल साजीद अब्दुल रज्जाक रा.शास्त्रीनगर ,अली.मोहमद  अली ताज.रा.हरीनगर,अब्दुल रौफ कुरेशी रा.खुरेशी मोहल्ला, शेख मुनिर शे.तुराबोद्दीन रा.शास्त्रीनगर ,अकबर खान अय्युब खान रा.शास्त्रीनगर,यशवंतसिंग मदनसिंग ठाकूर रा.शास्त्रीनगर,हे सहा जणं आढळून आले.या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीसांनी घटनास्थळांवरुन नगदी रोकड व मोबाईल असा एकूण २२७००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सदरील पत्तेबहादरांविरोधात पुर्णा पोलिस ठाण्यात पो.उप.निरीक्षक माणीक गुठ्ठे यांच्या तक्रारीवरून वरिल सहा जणांविरुद्ध १२ (अ) तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांनुसार कलम कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांनी तपास शास्त्रीनगर भागाचे बीट जमादार नितीन वडकर यांच्या कडे सोपवीला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या