💥परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या वाईत पुण्याहून कुटुंबासह दाखल झालेला व्यक्ती निघाला कोरोना बाधीत...!


💥परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी रात्री रवाना करण्यात आले💥

परभणी (दि.०४ जुलै) - जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या वाई येथे पुण्यातून आज शनिवार दि.४ जुलै रोजी सकाळी ०४-३० वाजेच्या सुमारास पत्नी मुलांसह पोहचल्यावर त्या व्यक्तीचा कोरोना बाधित असल्याचा रिपोर्ट पाॅझिटीव अहवाल आल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे येथून सकाळी ०४-३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील वाई या आपल्या मुळ गावी संबंधित कोरोना बाधित आपल्या पत्नी,मुलीसह कार मधून आला आहे.पुणे येथे काही दिवापुर्वी स्वॅब घेतला असल्याने तो सेलू येथे दाखल झाल्यानंतर कोरोना पाॅझिटीव अहवाल आला.
शहरातील उपजिल्हा रुग्णालयातून त्या व्यक्तीस परभणीला पुढील उपचारासाठी रात्री रवाना करण्यात आले. संपर्कातील आलेल्यांना कोरंनटाईन  करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या