💥परभणीत संचारबंदी काळात होणारा मुक्त संचार थांबवा व्यापारी महासंघाद्वारे प्रशासनास साकडे....!


💥अटी व शर्थीचे उल्लंघन करणा-या व्यक्तींना दंड ठोठावण्यात येईल - आयुक्त पवार

परभणी (दि.04 जुलै) - संचारबंदीच्या काळात काही भागातील नागरिकांचा मुक्त संचार जिल्हा महसुल व पोलिस प्रशासनाने तात्काळ थांबवावा, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिका-यांनी केली. 
महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी व्यापारी महासंघाच्या पदाधिका-यांना महानगरपालिकेच्या सभागृहात पाचारण केले होते. त्यांच्या  समवेत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुसंवाद साधला. त्यातून प्रभावी अशा उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे. व्यापा-यांनीही सर्वोत्तपरी सहकार्य करीत अटी व शर्थीचे पालन करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके, कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार, सचिव तथा मनपा सदस्य सचिन अंबिलवादे, पाडेलासेठ, रूद्रवार, अशोक जोगड, अग्रवाल, बाळकृष्ण गडम, मनोज माटरा यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत, सहाय्यक आयुक्त वाघमारे, उमेश जाधव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आयुक्त पवार यांनी शहरात दिवसेेदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. शहरातील व्यापा-यांनी महापालिकेस सहकार्य करावे. सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. येणा-या ग्राहकांना मार्गदर्शन करावे. बाजारपेठे, दुकानांवर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी व सॅनिटायझरचा वापर करावा, असे म्हटले. यावेळी हाके यांनी तीन दिवस संचारबंदी लागू केल्यानंतर सुध्दा रस्त्यारस्त्यांवर व्यक्ती मोठ्या प्रमाणावर फिरतांना आढळत आहेत. विशेषतः लॉकडाऊन असताना सुध्दा बाहेरगावावरून येणा-या नागरिकांवर प्रशासनाचे नियंत्रण नाही, असे नमुद केले. अंबिलवादे यांनी जुना मोंढ्यातील सर्व व्यवहार सुरू आहेत. त्या ठिकाणी दिवसेदिवस गर्दी वाढत आहे. गर्दी वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. व्यापा-यांना दुकाने बंद ठेवा असे सांगितले जाते. मात्र जुन्या मोंढ्यात सर्व व्यवहार सुरू असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले.
वट्टमवार यांनी तीन महिन्यांपासून बाजारपेठा बंद आहेत. काम कोलमडले आहेत, असे नमुद करीत व्यापा-यांमार्फत 10 हजार मास्क वितरीत करण्यात आले असल्याची माहिती दिली. यावेळी आयुक्त पवार यांनी शहरात पथके तैनात आहेत. अटी व शर्थीचे उल्लंघन करणा-या व्यक्तींना दंड ठोठावण्यात येत असल्याची माहितीही दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या