💥पुर्णा पोलीस स्थानकाचे सपोनि.प्रविण धुमाळ यांची अवैध दारू गुटखा विक्रेत्यांच्या विरोधात धडक मोहीम....!💥शहरातील अवैध देशी-विदेशी दारू विक्रेत्याच्या घरावर धाड;धाडीत ९ हजार रुपयांचा अवैध देशी-विदेशी दारू जप्त💥

परभणी/पुर्णा (दि.०७ जुलै) -पुर्णा पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी तथा सपोनि.प्रविण धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने मागील दोन दिवसापासून सातत्याने शहरातील अवैध देशी-विदेशी दारू विक्रेत्यांसह अवैध गुटखा  विक्रेते अवैध रेती तस्करांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतल्याने शहरासह तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे दिसत असून काल सोमवार दि.०६ जुलै २०२० रोजी शहरातील मस्तानपूरा व नवा मोढा परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून धाडसी कारवाई करीत हजारो रुपयांचा अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठा जप्त केल्याच्या सलग दुसऱ्याच दिवशी आज मंगळवार दि.०७ जुलै रोजी रोजी सायं.०४-०० वाजेच्या सुमारास सपोनि.धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील लोकमान्य टिळकरोड परिसरातील अवैध देशी-विदेशी दारू विक्रेत्याच्या घरावर छापा मारून देशी दारुच्या ८८ बाटल्या व विदेशी दारुच्या १६ बाटल्या असा अंदाजे ९ हजार रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त केल्याची धडक कारवाई केली. या धाडसी कारवाई वेळी सपोनि.धुमाळ यांच्या पथकात त्यांचे पथकातील सहकारी पोहेकाॅ.समिर पठाण, पो.काॅ.राठोड,पो.काॅ. अक्षय वाघ, पो.काॅ.गिरीश चन्नावार,पोकाॅ.नरेंद्र घोडे आदी उपस्थित होते. या प्रकरणी पुर्णा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायं उशिरापर्यंत सुरू होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या