💥महाराष्ट्र राज्यातील कोरोना मुक्त झालेल्या रुग्नांची संख्या सव्वा लाखाहून अधिक तर मृत्यूदर 4.19 टक्के एवढा....!  • 💥93 हजार 652 रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती💥
मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या नऊ दिवसात 34,105 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.19 टक्के असून आज कोरोनाच्या 4067 रुग्णांना घरी सोडण्यात आले.आतापर्यत एकूण संख्या 1,27,259 झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 6,875नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 93,652 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 12,22,487 नमुन्यांपैकी 2,30,599 नमुने पॉझिटिव्ह (18.86 टक्के) आले आहेत. राज्यात 6,49,263 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 48,191 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज 219 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 4.19 टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले 219 मृत्यू हे मुंबई मनपा-68, ठाणे-८, ठाणे मनपा-20, नवी मुंबई मनपा-5, कल्याण-डोंबिवली मनपा-18, उल्हासनगर मनपा-3, भिवंडी-निजापूर मनपा-9, मीरा-भाईंदर मनपा-3, पालघर-१, वसई-विरार मनपा-7, रायगड-9, पनवेल मनपा-8, नाशिक-3, नाशिक मनपा-1, अहमदनगर-1, अहमदनगर मनपा-1, जळगाव-6, जळगाव मनपा-1, नंदूरबार-2, पुणे-2, पुणे मनपा-18, पिंपरी-चिंचवड मनपा-7,सोलापूर-4, सोलापूर मनपा-4, सातारा-3, जालना-1, लातूर मनपा-1,नांदेड-1,अमरावती-1,नागपूर-1, नागपूर मनपा-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील 1 अशी नोंद आहे.
एकूण: बाधित रुग्ण-(2,30,599), बरे झालेले रुग्ण-(1,27,259), मृत्यू- (9,667), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(21),ॲक्टिव्ह रुग्ण-(93,652).

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या