💥साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ करिता 9 अॉगष्ट अर्यंत अर्ज करण्याचे आवाहन...!



💥ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरीत होणार💥  


मुंबई , दि. 24 (प्रतिनिधी) : मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग. मिनी मादीग, मादींगा, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी,12 वी,पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडुन सरासरी 60 पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.    
ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला,रेशनकार्ड,आधार कार्ड,शाळेचा दाखला,मार्कशीट,2  फोटो.पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ.सह 2  प्रतीत  आपले पूर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या),मुंबई-गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. 33, बांद्रा (पू), मुंबई-51 या पत्त्यावर दि.9 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करावा, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या),जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या