💥परभणी जिल्ह्याचा माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल 84.66 टक्के....!💥औरंगाबाद विभागात निचांकी निकाल, पुन्हा एकदा मुलींनीच मारली बाजी💥

💥विज्ञान शाखेचा 92.20, कला 77.10, वाणिज्य 91.51, एमसीव्हिसी 76.45 टक्के निकाल💥

परभणी (दि.16 जुलै) फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे यामध्ये परभणी चा निकाल 84.66 टक्के इतका जाहीर झाला आहे. हा निकाल औरंगाबाद विभागात सर्वात निचांकी राहिला आहे.

इयत्ता बारावी परीक्षेत 13823 मुले व 9023 मुली असे एकूण 22849 विद्यार्थी परीक्षेत बसले होते यापैकी अकरा हजार एकशे अठरा मुली मुले तर 8227 मुली उत्तीर्ण झाले आहेत. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्याने बाजी मारली असून सर्वात कमी निकाल पूर्णा तालुक्याचा राहिला आहे. यात सेलू 89. 79, गंगाखेड 87. 65, परभणी 85. 39, पाथरी 85.15, पालम 84.68, जिंतूर 84, मानवत 80.65, सोनपेठ 79 तर पूर्णा 78. 36 टक्के निकाल जाहीर झाला आहे.
विज्ञान शाखेत प्रविष्ट झालेल्या नऊ हजार 55 पैकी 8349 उत्तीर्ण झाले असून गुणवत्ता यादीत 460 विद्यार्थी आले आहेत. कला शाखेत दहा हजार 696 विद्यार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यापैकी आठ हजार 245 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यात 639 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. वाणिज्य शाखेतील 2531 विद्यार्थ्यांपैकी 2316 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 497 विद्यार्थी गुणवत्तेत आले आहेत. एमसीव्हीसी मध्ये 569 विद्यार्थी परीक्षा पैकी 435 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून आठ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत यश मिळविले आहे. परभणी जिल्ह्यात यावर्षी पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचे समोर आले आहे. उत्तीर्ण होण्यामध्ये मुली 91.15 तर मुले 80.49 टक्के आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या