💥परभणी जिल्ह्यात रविवारी 49 रुग्णांची नोंद झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला...!💥गंगाखेडमध्ये सर्वाधिक एकूण 32 रुग्ण सापडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले💥

परभणी (दि.12 जुलै) - जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावा आता पुर्वीपेक्षा जोमाने वाढत असल्याचे निदर्शनास येत असून आज रविवार दि.12 जुलै रोजी 49 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला असून आजपर्यंत ही सर्वात मोठी संख्या आहे अधिक रुग्ण हे गंगाखेड शहरातील असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू झाले आहेत.....गंगाखेडमध्ये एकूण 32 रुग्ण सापडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले..


💥कोरोनामुक्त दोघांना डिस्चार्ज 
आनंद नगरातील बाधिताचा नांदेडला मृत्यू💥 

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संक्रमीत कक्षातील कोरोनाबाधित दोन रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालय प्रशासनाने सर्व सोपस्कार पूर्ण करीत रविवारी(दि.12) डिस्चार्ज दिला.त्यात गंगापुत्र कॉलनीतील 26 वर्षीय व 34 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
 दरम्यान,नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व परभणीच्या प्रयोगशाळेकडून रविवारी सायंकाळी प्राप्त अहवालाप्रमाणे एकूण 16 व्यक्तींचे स्वॅब पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर 57 व्यक्तींचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-यांनी  रविवारी एकूण 38 दाखल झालेल्या संशयितांचे तपासणी केली. पाठोपाठ नांदेड  व परभणी येथील प्रयोगशाळेकडे एकूण 40 जणांचे स्वॅब पाठविले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात आतापर्यंत एकूण 3183 संशयित दाखल झाले आहेत. 3411 जणांचा स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 2992 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. पॉझीटीव्ह स्वॅबची संख्या 226 एवढी असून प्रलंबीत स्वॅबची संख्या 35, अनिर्णायक अहवालाची संख्या 110 एवढी झाली आहे. आजपर्यंत तपासणीसाठी आवश्यक नसणा-या स्वॅबची संख्या 48 एवढी आहे.

💥कोरोनाबाधित रुग्णांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला💥. 


त्यात नांदेड येथील रूग्णालयात मृत्यू पावलेल्या सेलू येथील महिलेसह रविवारी परभणीच्या आनंदनगरातील 34 वर्षीय बाधित पुरूषाचा समावेश आहे.  तसेच 116 जण कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. संक्रमीत कक्षात आता 106 रुग्ण उपचार घेत आहेत तर बाहेरील जिल्ह्यातील कोरोनाबाधित 2 व्यक्तींवर परभणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा रूग्णालयातील संसर्गजन्य कक्षात एकूण 156 रुग्ण आहेत. विलगीकरण केलेले 326 जण असून विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले 2701 एवढया व्यक्ती आहेत.परदेशातून आलेले 74 व त्यांच्या संपर्कात आलेले 6 व्यक्तींचा समावेश आहे.
दरम्यान, परभणीत शहरात एकूण 6, तालुक्यातील दैठण्यात एक, सेलूत शहरात एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला आहे. तर जिंतूर तालुक्यातील कावी येथील 70 वर्षीय रुग्ण नांदेड येथील औषधोपचारा दरम्यान पॉझिटीव्ह आढळून आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या