💥नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली 458.....!💥काल दिवसराच्या काळात 21 नव्या रुग्णांची पडली भर💥

नांदेड (दि.07 जुलै) - कोरोनाचे रुग्णांचे रिपार्ट थांबण्याचे नाव घेत नसून रात्री दहा वाजेच्या सुमारास 38 नमून्यांचा अहवाल आला. यात 14 अहवाल निगेटीव्ह, 13 अहवाल अनिर्णीत तर 11 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे दिवसभराच्या काळात तब्बल 21 रुग्ण कोरोनाचे नवे आढळले, असून रुग्णांची संख्या 458 इतकी झाली आहे.

सोमवार दि. 6 जुलै रोजी सकाळी तीन रुग्ण, दुपारनंतर दोन, सहा वाजता पाच तर रात्री दहा वाजेच्या सुमारास आलेल्या अहवालात 11 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे दिवसराच्या काळात 21 नव्या रुग्णांची भर पडली, असून हे रुग्ण नांदेड शहरासह जिल्ह्यातील असल्याची नोंद झाली आहे. कोरोनाच्या रुग्णांचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने चिंतेचे ढग दाटून येत आहेत.

——-------------------------------------------------------------

💥उपमहापौर कोरोनाबाधित💥


नांदेड-वाघाळा महानगर पालिकेचे उपमहापौरांचा अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यापूर्वी माजी महापौर, विद्यमान नगरसेवक एक माजी नगरसेवकानंतर उपमहापौरांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या