💥परभणी जिल्ह्यात आज मंगळवार दि.28 जुलै रोजी पुन्हा आढळले 30 कोरोना बाधीत रुण.....! 💥परभणी शहर पुर्णा गंगाखेड व सेलु तालुक्यातील तिस रुग्णांचा समावेश यात 16 पुरुष 14 महिला रुग्ण💥

परभणी (दि.28 जुलै) - जिल्ह्यात आज मंगळवार दि.28 जुलै रोजी सायंकाळी आलेल्या रिपोर्टनुसार 30 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत या तिस कोरोना बाधीत रुग्णात परभणी शहर पूर्णा गंगाखेड आणि सेलू या तालुक्यातील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.


 जिल्ह्यात आज सायंकाळी सातवाजे पर्यंत 30 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत. त्यामध्ये 16 महिला व 14 पुरूषांचा समावेश आहे. 
परभणी शहरात 12 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या असून लोकमान्य नगरात 45 वर्षीय, काद्राबाद प्लॉट भागात 36 वर्षीय पुरूष, नांदखेडा रस्त्यावर 25 वर्षीय तरूणी व 65 वर्षीय पुरूष, धार रस्त्यावर 60 वर्षीय महिला, बापू गेनू रस्त्यावर 95 वर्षीय महिला, राजेंद्रगिरी नगरात 42 वर्षीय पुरूष, मोमीनपुरात 88 वर्षीय महिला, हडको अजिंठा नगरात 62 वर्षीय महिला, मदिना नगरात 58 वर्षीय पुरूष, वडगल्लीत 55 वर्षीय महिला व राठोड गल्लीत 57 वर्षीय पुरूष बाधित आढळून आला. परभणी तालुक्यात पिंगळी, वरपूड, माळसोन्ना या तीन गावात तीन व्यक्ती,पूर्णा शहरातील शास्त्रीनगर,रेल्वे क्वॉर्टर,आनंद नगरात एकून 6 व्यक्ती, गंगाखेड शहरात दिलकश नगर,नगरेश्‍वर गल्ली, नवा मोंढा, तारू मोहल्लात एकूण 4 व्यक्ती, गंगाखेड ग्रामीण ढोलकेवाडीत एक व्यक्ती, सेलू शहरात पारीख कॉलनी व मारोती नगरात एकूण चार व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या