💥विलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले २७०९ एवढया व्यक्ती आहेत💥
परभणी (दि.१३ जुलै) - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षातील एकूण ५ कोरोनाबाधित व्यक्तीं कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालय प्रशासनाने आज सोमवार दि.१३ जुलै रोजी सर्व औपचारिकता पूर्ण करीत या रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली आहे. या रुग्णांमध्ये गंगापुत्र कॉलनीतील २८ वर्षीय पुरूष, एकता नगरातील ५७ वर्षीय पुरूष, नाथ नगरातील ४६ वर्षीय पुरूष व ३९ वर्षीय महिला, काद्राबाद प्लॉट भागातील ४० वर्षीय महिला असे एकूण पाच जणांचा समावेश आहे.
दरम्यान, परभणी शहरातील जागृती कॉलनीतील दोन, जिल्हा कारागृह, सोनार गल्ली, बसस्थानक, नांदखेडा रोड, ममता कॉलनी, लक्ष्मी नगर, मोठा मारूती देशमुख गल्ली, मानवत मेनरोड, सेलूत सर्वोदय नगर, पाथरीत एकता नगर असे एकूण १२ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले.
दरम्यान,नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परभणीच्या प्रयोगशाळा व गंगाखेडातील रॅपिड अॅन्टीजन टेस्टच्या सोमवारी सायंकाळी प्राप्त अहवालाप्रमाणे एकूण २१ व्यक्तींचे स्वॅब पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर १९७ व्यक्तींचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज सोमवारी एकूण ४० दाखल झालेल्या संशयितांचे तपासणी केली. पाठोपाठ नांदेड व परभणी येथील प्रयोगशाळेकडे एकूण ४० जणांचे स्वॅब पाठविले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात आतापर्यंत एकूण ३४४२ संशयित दाखल झाले आहेत. ३६७२ जणांचा स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी ३१८९ जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. पॉझीटीव्ह स्वॅबची संख्या २७९ एवढी असून प्रलंबीत स्वॅबची संख्या ४६,अनिर्णायक अहवालाची संख्या ११० एवढी झाली आहे. आजपर्यंत तपासणीसाठी आवश्यक नसणा-या स्वॅबची संख्या ४८ एवढी आहे.
कोरोनाबाधित रुग्णांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला. त्यात आज सोमवार दि.१३ जुलै रोजी मृत्यू पावलेल्या जुना पेडगाव रस्त्यावरील लक्ष्मी नगरातील ४५ वर्षीय कोरोनाबाधित परंतू कर्करोग आणि किडनीने ग्रस्त असणाऱ्या रुग्णाचा तसेच पाथरीतील ६८ वर्षीय कोरोनाग्रस्त परंतू हदयविकारा आणि फुफ्फुस तसेच मधुमेहाचा त्रास असणा-या व्यक्तीचा दोघांचा समावेश आहे.
१२१ जण कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. संक्रमीत कक्षात आता १५५ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील एका रुग्णास नांदेड येथे उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे. तर बाहेरील जिल्ह्यातील कोरोनाबाधित २ व्यक्तींवर परभणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा रूग्णालयातील संसर्गजन्य कक्षात एकूण १७५ रुग्ण आहेत. विलगीकरण केलेले ३३७ जण असून विलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले २७०९ एवढया व्यक्ती आहेत.परदेशातून आलेले ७४ व त्यांच्या संपर्कात आलेले ६ व्यक्तींचा समावेश आहे....
0 टिप्पण्या