💥परभणी जिल्ह्यातील गंगाखेडात तब्बल 100 व्यक्ती होम क्वारंटाईन...!💥शहरातील 11 कोरोना बाधीतांच्या संपर्कातील 100 लोकांना तालुका प्रशासनाने केले होम क्वारंटाईन💥

गंगाखेड (दि.09 जुलै) - गंगाखेड शहरातील 11 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या संपर्कातील सुमारे 100 व्यक्तींना तालुका प्रशासनाने होम क्वारंटाईन केले आहे. 
गंगाखेड तालुक्यातील एक व शहरातील एक महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्या होत्या. त्या दोन महिलांच्या संपर्कातील 63 जणांचे स्वॅब आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यातील गंगाखेड शहरातील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील दहा जण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल बुधवारी (दि.08) रोजी रात्री 11 वाजता प्राप्त झाला. पाठोपाठ शहरात मोठी खळबळ उडाली.त्या महिलेसह परिवाराने कुटुंबातील एका सदस्याच्या विवाहानिमित्त आयोजीत केलेल्या स्वागत समारंभातील एकूण 11 व्यक्ती बाधित आढळल्याने तालुका प्रशासनाने त्या सभारंभास हजेरी लावलेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला. पाठोपाठ एकूण गेल्या दोन दिवसांत शंभरावर व्यक्तींना होम क्वारंटाईन केले आहे

महिला 6 जुलै रोजी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली. त्या महिलेच्या संपर्कातील 43 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यातील 10 जणांच्या स्वॅबचे अहवाल बुधवारी उशीरा रात्री पॉझिटीव्ह आले. या स्वागत समारंभास उपस्थित राहिलेल्या शंभरहून अधिक जणांची तालुका प्रशासनाने आरोग्य विभागामार्फत तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यास सुरूवात केली आहे. या सर्वांचे स्वॅब येत्या दोन दिवसात येवून त्यांची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती तहसिलदार स्वरुप कंकाळ यांनी दिली. गंगाखेडात दहा जणांचे स्वॅब एकाच दिवशी पॉझिटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू करुन वेताळ गल्ली, व्यंकटेश नगर, हाटकर गल्ली, पूजा मंगलकार्यालय, नगरेश्‍वर गल्ली या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले.

💥धन्यवाद साभार - श्री. अजित गणाचार्य गंगाखेड यांच्या कडून

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या