💥औरंगाबाद शहर व परिसरात 10 ते 18 जुलै पर्यंत कडक संचारबंदी...!💥संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला तसेच मेडिकल दुकानही  राहणार बंद; औषधी पुरवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा💥

औरंगाबाद (दि.०६ जुलै) : शहर परिसरात वाढत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्ये मुळे येत्या १० जुलै ते १८ जुलै २०२० या कालावधीत कडक संचारबंदीची घोषणा प्रशासनाने केली. या कालावधीत उद्योग, व्यापारही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेने यास प्रतिसाद द्यावा यासाठी प्रशासन यास जनता कर्फ्यू असे संबोधत आहे.
संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला तसेच मेडिकल दुकानेही बंद राहणार असून औषधी पुरवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या