💥जगभरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली 1 कोटी 44 लाखाहून अधिक..!💥जगभरात आतापर्यंत कोरोना मुळे 6 लाख लोकांचा दुर्दैवी मृत्यू💥 


नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था)  : जागतिक साथीच्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अजूनही वाढत आहे आणि आतापर्यंत जगभरात सुमारे 6 लाख 4 हजारांहून अधिक लोक मृत्यू पावले आहेत आणि संक्रमित रूग्णांची संख्या 1 कोटी 44 लाखांहून अधिक झाली आहे. यातील दोन तृतीयांश सर्वात जास्त प्रभावित युरोपमधील आहेत. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्र (सीएसएसई) च्या संकलित केलेल्या आकडेवारीनुसार 18  जुलै रोजी रात्री उशीरा पर्यंत सुमारे 6,04,883 लोकांचा कोरोना साथीच्या आजारामुळे मृत्यू झालोला आहे. जगातील कोरोना विषाणूंची लागण झालेल्या संसर्गाची संख्या 1,44,24,817 पर्यंत वाढली आहे, त्यातील 86,12,096 जण संसर्गमुक्त झाले आहेत.
💥अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू ; भारत तिसर्‍या क्रमांकावर💥

कोरोना विषाणूची लागण भारतातही खूप वेगाने वाढत आहे .संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत आता भारत तिसर्‍या स्थानावर आहे. देशात एकूण रूग्णांची संख्या 10,77,864 आहे, तर एकूण 26, 828 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि 6,77,630 रुग्ण या आजारानंतर बरे झाले आहेत. सीएसएसईच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोरोना विषाणूंची लागण जगात सर्वाधिक लोकांमध्ये झाली असून येथे सुमारे 38 लाखांजवळ बाधित झालेले आहेत. जगातील महासत्ता समजल्या जाणार्‍या अमेरिकेत 38,33,271  संक्रमण आणि 1,42,877 मृत्यू आहेत. यापैकी 17,75,219 बरे झाले आहेत.
ब्राझिलमध्येही कोविड-19 चा उद्रेक सातत्याने वाढत आहे आणि  संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत हा देश अमेरिकेनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. देशात संसर्ग झालेल्यांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत संसर्ग झालेल्यांची संख्या 20,75,246 आहे आणि 78,817 लोक मरण पावले आहेत. तर 13,66,775 लोक उपचारानंतर घरी परतले आहेत.
कोरोना बाधित देशांच्या यादीत रशिया चौथ्या क्रमांकावर आहे. येथे  संक्रमित लोकांची एकूण संख्या 7,65,437 वर पोहोचली आहे. या विषाणूमुळे देशात मृतांची संख्या 12,247 आहे. आतापर्यंत देशातील एकूण 5,46,863 लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे.
💥दक्षिण आफ्रीकेत झपाट्याने वाढणारी प्रकरणे💥
कोरोना विषाणूनंतर अमेरिका, ब्राझील, भारत आणि रशियानंतर दक्षिण आफ्रीका जगातील पाचव्या क्रमांकावर आहे. येथे संसर्गाची संख्या 3,50,879 वर पोहोचली आहे, तर 4,938 लोकांचा या मृत्यू झाला आहे. दक्षिण आफ्रीकेतील संसर्गाचे नवीन केंद्र म्हणजे गौतेंग प्रांत, जिथे देशातील सुमारे एक चतुर्थांश लोकसंख्या राहते, त्यातील बरेच लोक गर्दीच्या ठिकाणी राहतात. आफ्रीकन खंडातील एकूण प्रकरणांपैकी जवळपास निम्म्या घटना याच देशातील आहेत.
इटलीमध्ये साथीच्या रोगाने युरोपमधील गंभीर आजाराने 35,042 लोकांचा मृत्यू आहे. येथे 2,44,216 लोक संक्रमित झाले आहेत. स्पेनमधील कोरोना रुग्णांची संख्या 2,60,255 आहे तर येथे 28,420 लोक मरण पावले आहेत. या जागतिक महामारीचा केंद्रबिंदू असलेल्या चीनमध्ये आतापर्यंत 85,314 लोक संक्रमित झाले आहेत आणि 4,644 लोक मरण पावले आहेत. या विषाणूं विषयी तयार केलेल्या अहवालानुसार, चीनमध्ये होणार्‍या मृत्यूंपैकी 80 टक्के मृत्यू हे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे होते.
फ्रांस आणि जर्मनी या युरोपियन देशातील परिस्थितीही खूप वाईट आहे. फ्रांसमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची कोणतीही नवीन घटना नोंदली गेलेली नाही किंवा कोणाचाही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत येथे 1,74,674 लोकांना लागण झाली आहे आणि 30,152 लोक मरण पावले आहेत. जर्मनीमध्ये 2,02,572 लोकांना कोरोना विषाणूंची लागण झाली आहे आणि 9,162 लोक मरण पावले आहेत, बरे झालेल्या रूग्णांची संख्या 1,87,800 आहे.
ब्रिटनमधील परिस्थितीही दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. आतापर्यंत 2,94,066 लोकांना या साथीचा आजार झाला आहे आणि आतापर्यंत 45,273 लोक मरण पावले आहेत. तसेच 2,18,717 लोकांना तुर्कीमध्ये कोरोनाची लागण झाली आहे आणि 5,475 लोक मरण पावले आहेत. संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये कोरोना संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या  56,711 पर्यंत वाढली आहे. येथे 338 लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूचा तीव्र परिणाम झालेल्या आखाती देश इराणमध्ये 2,71, 606 लोकांना संसर्ग झाला आहे, येथे 13,979 लोक मरण पावले आहेत. तर इराकमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 90,220 पर्यंत वाढली आहे आणि येथे एकूण 3,691 लोक मरण पावले आहेत. बेल्जियममध्ये 9,800 लोकांचा मृत्यू, नेदरलँडमध्ये 6,155, कॅनडामध्ये 8,891, मेक्सिकोमध्ये 38,310, स्वीडनमध्ये 5,619, स्वित्झर्लंडमध्ये 1969, आयर्लंडमध्ये 1753 आणि पोर्तुगालमध्ये 1684 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय पाकिस्तानमध्ये संक्रमित एकूण संख्या 2,61,916 पर्यंत पोहोचली असून 5,522 लोकांचा मृत्यू झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या