💥परभणीत चोवीस तासात मिळाले ४ कोरोना बाधीत रुग्ण,कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली एकतीस...!💥जिल्ह्यात एकूण १०३ रूग्ण त्यापैकी ९० रुग्ण कोरोनामुक्त💥

परभणी (दि.२५ जुन) - येथील महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढतांना दिसत असून गेल्या २४ तासात शहरात एकूण चार कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासन हादरले आहे.परभणी महानगर पालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ३१ पर्यंत पोचली आहे.


दरम्यान, तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची ७ एवढी झाली असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०३ एवढी झाली आहे.एकूण १०३ कोरोनबाधित रुग्णांपैकी ९० रुग्ण बरे होवून घरीही परतले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून १० रुग्ण संक्रमीत कक्षात उपचार घेत आहेत.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सर्वदूर पसरत असतांना या जिल्ह्यात लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. परंतू पुण्याहून परतलेल्या एका युवकाचा स्वॅब पॉझिटीव्ह आढळल्यानंतर या महानगराने, परिणामी जिल्ह्यानेही कोरोनाबाधित रुग्णांचे खाते उघडले. एमआयडीसी परिसरात सापडलेल्या युवकाने परभणी वासियांना मोठा धक्का दिला.अन् तेथूनच एकापाठोपाठ बाधित रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली. विशेषतः मुंबई,पुण्यासह अन्य महानगराहून एैनकेन प्रकारे या महानगरात, या जिल्ह्यात परतलेल्या व्यक्तींच मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित आढळून आल्या.
परभणी महानगरपालिका हद्दीत साखला प्लॉट भागात पुण्याहून परतलेल्या युवकाचा स्वॅब पॉझिटीव्ह आढळला. पाठोपाठ मिलिंदनगरात मुंबईहून परतलेल्या एका महिलेचा स्वॅबही पॉझिटीव्ह आढळला. एकूण या भागात चार बाधित रुग्ण आढळून आले आहेत.शहरातील मातोश्री नगरातही एकूण पाच, पेडगाव रस्त्यावर पुण्याहून परतलेली एक युवती, नानलपेठ परिसरातील पोलिस वसाहतीत एक पोलिस कर्मचारी, पाठोपाठ त्रिमुर्ती नगरात एका मातेसह तिची नऊ वर्षीय मुलगी पाठोपाठ दोन वर्षीय बालक असे एकूण तीने, इटलापूर मोहल्ला परिसरात एकूण पाच, नागसेननगर, शास्त्रीनगरातील एक पारिचारिका कोरोनाबाधित आढळून आली. त्यानंतर मात्र हे सत्र थोडेसे थांबले खरे परंतू जिल्ह्यातील अन्य तालुक्यात एकापाठोपाठ एक कोरोनाबाधित रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली.१५ दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर सरफराज नगरात मुंबईहून परतलेला एक जवान, पाठोपाठ वृंदावन कॉलनीत सोलापूरहून परतलेली एक युवती तसेच सुंदराईनगर, अपना कॉर्नर या परिसरातही प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला.
गेल्या २४ तासात इक्बाल नगर, अपना कॉर्नर, गव्हाणे रोड पाठोपाठ बुधवारी रात्री काद्राबाद प्लॉट भागातील रहिवाशी तथा जिल्हा शासकीय रुग्णालयातील एक पारिचारिका कोरोनाबाधित आढळून आली. त्यामुळेच महापालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ एवढी झाली.

💥तालुक्यातही सात रुग्ण💥

परभणी तालुक्यातही पिंपळगाव ठोंबरे,असोला, माळसोन्ना, कारेगाव - २2, जांब पाठोपाठ आज गुरूवार दि.२५ जुन रोजी सकाळी पाथरा येथील एक रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे.

💥पालम शुन्य अन्य तालुक्यात ६५💥

परभणी शहरासह तालुक्यात व्यतिरिक्त अऩ्य तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण ६५ एवढी आहे. त्यात गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १९, पाठोपाठ पूर्णा तालुक्यात १३, जिंतूर तालुक्यात ११,सोनपेठ तालुक्यात ९, सेलू तालुक्यात ७, मानवत ५ व पाथरी तालुक्यात १ एवढे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या