💥परभणीतुन सचखंड एक्सप्रेस मधून ६२ प्रवाशी रवाना...!💥सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत या प्रवाशांना क्रमाने रेल्वे डब्ब्यांमध्ये प्रवेश दिला गेला💥

परभणी( दि.०१)-लॉकडाऊनमधील तब्बल ७२ दिवसांनंतर आज सोमवार दि.०१ मे रोजी दिल्लीकडे धावलेल्या हुजूर साहिब नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेसमधून परभणीचे ६२ प्रवाशी रवाना झाले. 

आज सोमवार दि.०१ मे रोजी सकाळी बरोबर १०-५५ वाजेच्या सुमारास सचखंड एक्सप्रेस येथील रेल्वे स्थानकावर दाखल झाली व नियमित वेळेप्रमाणे लगेचच रवाना झाली.
पहिल्या लॉकडाऊनपासून बंद झालेली सचखंड एक्सप्रेस सुरू होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर प्रवाशांनी त्याचे आरक्षण केले होते.
एकूण ६२ प्रवाशांनी केलेल्या आरक्षणाप्रमाणे रेल्वे प्रशासनाने सर्वोत्तपरी खबरदारी घेत रविवारीच संपूर्ण स्टेशन परिसर निर्जंतुकीरण केला होता. कागदपत्राची व तिकिटाची पाहणी करून प्रवाशांना रेल्वे स्थानकाच्या आत प्रवेश देण्यात आला. सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत या प्रवाशांना क्रमाने रेल्वे डब्ब्यांमध्ये प्रवेश दिला गेला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या