💥पुर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कावलगावात वाळू तस्करांच्या विरोधात धाडसी कारवाई....!



💥जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत 21,78,500/-रुपयांचा मुद्देमाल जप्त💥

परभणी/पुर्णा (दि.08 जुन)पुर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कावलगाव शिवारातल्या गावाचे पुर्व बाजूस गोदावरी नदीच्या पात्रात काल रविवार दि.07 जुन 2020 रोजी काही वाळू तस्कर अवैध रित्या वाळूची चोरी करीत असल्याबाबतची माहिती जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय व अप्पर पोलिस अधीक्षक राग सुधा मॅडम यांना मिळाली मिळालेल्या माहिती वरून संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विशेष पथकाला तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन छापा मारण्यास सांगितले वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश मिळताच विशेष पथकाने छापा टाकून सदर ठिकाना वरून एक टेम्पो.दोन ट्रक्टर एक प्रतिबंधीत वाळू उपसा करणारी बोट,वाळू,असा एकूण 21,78,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला मुद्देमालासह एकूण 17 वाळू चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये 3 वाहन चालक 1 एक बोट चालक 3 मजूर तसेच बोटचे 10 दहा  भागीदार /मालक यांना सुध्दा आरोपी करण्यात आले असून या घटनेतील 6 आरोपी अटक करण्यात आले आहेत.

या गुन्ह्यातील 11 आरोपी फरार दाखवण्यात आले आहेत 1560500 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व  रात्री अंधार आसलेने व नदी पात्रातून बोट बाहेर काढने यासाठी साधन सामुग्री  उपलब्ध  नसलयामुळे आज सोमवार दि.08 जुन रोजी बोट जप्त करण्यात येणार आहे बोटची पाईपलाईन व टाक्या सह किँमत 6,18000 अशी आसून एकूण 21,78,500 रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे      
सदरील कार्यवाही पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय,अप्पर पोलिस अधीक्षक राग सुधा मॅडम यांचे मार्गद्शनाखाली विशेष पथकातील स.पो.निरीक्षक  हनुमंत पांचाळ स.पो.उप.निरीक्षक हनुमान कच्छवे,पो. हे.का. सखाराम टेकुळे, जगदिश रेड्डी, पो.का. विजय घनसावांत, अतुल कांदे, चालक गजेंद्र चव्हाण,तसेच आर. सी. पि. चे पो.का. लक्ष्मण बोडके, मोहिज पठाण, सादिक पठाण, शेख रमिज अशांनी मिळून केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या