💥बिडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची कन्हेरवाडी वनक्षेत्रास भेट,घेतला परळी महसूल विभागाचा आढावा...!💥जिल्हाधिकारी रेखावार यांनी भेटण्यास आलेल्या जनतेला वेळ देऊन आस्थेवाईकपणे अडचणी  ऐकून घेतल्या💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड, दि. १५ :- जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परळी तहसील कार्यालयास भेट देऊन महसूल विभागाचा आढावा घेतला, तसेच त्यांना भेटण्यास आलेल्या जनतेला वेळ देऊन अडचणी  ऐकून घेतल्या. तहसील कार्यालयातील कामकाज व समस्यांबाबत  कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, तलाठी , मंडळ अधिकारी व उपस्थित होते .जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी ऐकून घेऊन तहसील कार्यालयातील रिक्त पदे व इतर अडचणी  बाबत गाव निहाय आढावा घेतला. यात पुरवठा, संगणीकृत सातबारा, जमिनीचे फेरफार या महसूल आदी बाबींची माहिती घेऊन सूचना दिल्या.

त्यांनी यानंतर वनविभागाच्या कन्हेरवाडी येथील वन मारुती  परिसरातील घन वृक्ष लागवडीची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत परळीचे उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, नायब तहसीलदार बाबूराव रुपनर , रोहिणी मोरे व परळीचे  वन  परिक्षेत्र अधिकारी  एसजी वरवडे,  वनपाल  कस्तुरे वनरक्षक  व्ही एम दौंड उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या