💥राज्यात शिवसेनेच्या पुढाकारातून ८५ रूग्णवाहिका नागरीकांच्या सेवेत दाखल होणार...!



💥पहिल्या टप्प्यामधील २४ रूग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते संपन्न💥

मुंबई(दि.१४ जुन)-शिवसेनेच्या पुढाकारातून ८५ रूग्णवाहीका नागरीकांच्या सेवेत येणार असून यातील पहिल्या टप्प्यामधील २४ रूग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आज रविवार दि.१४ जुन रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.

शिवसेना नेते तथा युवा सेनाप्रमुख व राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने ५५ रूग्णवाहिका सिआरएस च्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला देण्यात येत आहे. यातील १२ रूग्णवाहिका महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यासाठी झी समूह,महिंद्रा अँड महिंद्रा कं, दिपक फर्टिलायझर,श्री.आनंद राठी यांचे सहकार्य लाभले.
-
त्याचप्रमाणे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकराने मुंबई आणि ठाणे या शहरांसाठी ३० रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहे. यापैकी ५ रूग्णवाहिका आयसीयु व व्हेंटीलेटर या सुविधांनी सुसज्ज आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या