💥पुर्णा तालुक्यातील कावलगाव येथे सोशल डिस्टन्सिंग चा फज्जा भाजप नेत्यांना कोरोना संक्रमणचा विसर...!💥“मोदी सरकार 2.0 - प्रथम वर्षपूर्ती” अभियानातील घर संपर्क कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांची उपस्थिती💥 

पूर्णा (दि.१९ जुन) - तालुक्यातील कावलगांव येथे सुरुवात करुण मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र वाटप केले. या कार्यक्रमा दरम्यान भाजपच्या सुज्ञ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे ही भान राहिले नाही यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा तर उडालाच याशिवाय अनेकांनी मास्कचाही वापर केला नाही  यावेळी दस्तुरखुद्द भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,प्रदेश कार्यकारिणी सदस्य व सभापति देसाई,यांची उपस्थिती होती

तर यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बलीराम कदम,भाजपा उधोग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष हनुमान अग्रवाल,बालाप्रसाद मूंदड़ा,स्वच्छ भारत अभियान जिल्हाअध्यक्ष रमेशराव गोलेगावकर,भाजपा विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विजय कराड,भाजपा तालुकाअध्यक्ष अनंतराव पारवे,जेस्ट नेते भगवान देसाई,राजू धुत,युवा जिल्हा उपाध्यक्ष आनंद बनसोडे,नंदुमामा डाखोरे,लहू शेळके,सत्यजीत बुलंगे.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. Market madhi pagha jaun purna chya kai haal aahet te tumala changle kaam karayla gelel changal watat nahi tumchya mul aaj desh mag rahila aahe tumhi saglyala bhadkun takly china and Hindustan ladai madhal taka kahi dusarcha kahi takaych

    उत्तर द्याहटवा