💥पोटच्या मुलाने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे नाकारले पण मुखाग्नी वसीमने दिला....! 💥अकोल्यातील श्रावगी प्लॉट भागातील घटना💥

अकोल्यातील श्रावगी प्लॉट भागातील देशपांडे नावाच्या वृद्ध व्यक्तीचा 23 मे रोजी जिल्हा रूग्णालयात कोरोनावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर रूग्णालय आणि महापालिका प्रशासनानं त्यांचे कुटूंबिय आणि आप्तेष्टांशी मृतदेह घेऊन जाण्यासंदर्भात संपर्क साधला. मात्र, मृत्यूच्या चोवीस तासानंतरही त्यांचा मृतदेह स्वीकारायला घरातलं कुणीच समोर आलं नाही. यामूळे प्रशासन मोठ्या चिंतेत सापडलं होतं.

याचवेळी प्रशासनाच्या आणि मानवतेच्या मदतीसाठी धावून आलेत अकोल्यातील 'कच्छी-मेमन जमात ट्रस्ट'चे मुस्लीम तरुण. या तरूणांनी या मृतदेहावर विधीवत अंत्यसंस्कारांची तयारी दाखवली. शहरातील मोहता मील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. 'कच्छी-मेमन जमात ट्रस्ट'चे जावेद झकारिया, तनवीर खान, अज़ीज़ खान, शेख इरफान, बाबा भाई, जावेद खान शाबाज़ खान, वसीम भाई, समीर भाई यांनी अंत्यसंस्काराची संपुर्ण जबाबदारी आपल्या शिरावर घेतली.  महापालिकेचे स्वछता अधिकारी प्रशांत राजुरकर हे कामात या तरूणांसोबत होते. सरणावर लाकडी रचली गेली. अंत्यसंस्काराचे विधीही पार पडले. पण सर्वात शेवटचा विधी होता चितेला अग्नी देण्याचा... वृद्ध मृत व्यक्तीच्या पार्थिवाला अग्नी वसीम खान आणि समीर खान या मुस्लिम तरूणांनी दिला. आगीच्या ज्वाळा उठताच सदर मृत व्यक्ती अनंतात विलीन झाली.

जिथे स्वत:च्या रक्ताच्या नात्यांनी नाकारलं, तिथे माणुसकीनं त्यांचा अंतिम प्रवास सुकर केली. ही व्यक्ती जरी मरण पावली, मात्र माणुसकीनं परत नव्यानं जन्म घेतला होता. रमजानच्या समारोपाला यासारखी  मदत  दुसरं असावी तरी काय?. या तरूणांच्या एका पावलानं त्यांच्यासाठी रमजान खऱ्या अर्थाने पावन झाला असंच म्हणावं लागेल...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या