💥परभणी जिल्ह्यातील बाजारपेठेतील सर्व व्यवसाय व व्यवहार पूर्णतः पुर्ववत करावेत...!
💥जिल्ह्याचे खा.संजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील  व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे💥

परभणी (दि.१८ जुन)-जिल्ह्यातील बाजारपेठेतील सर्व व्यवसाय व व्यवहार पूर्णतः पुर्ववत करावेत,अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाच्या एका शिष्टमंडळाने आज गुरूवार दि.१८ जुन रोजी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांची भेट घेवून केली. 

खा.संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके, सचिव सचिन अंबिलवादे, रेडिमेड असोसिएशनचे अध्यक्ष  मनोज माटरा, विवेक वट्टमवार, मनोज तुलसानी  यांच्यासह अन्य व्यापा-यांनी गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी श्री मुगळीकर यांची भेट घेतली. त्यातून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने अन्य शासकीय यंत्रणांच्या भक्कम समन्वयातून केलेल्या उपाययोजनांचे मुक्त कंठाने कौतुक केले. अनलॉक वनच्या टप्प्यात प्रशासनाने जिल्ह्यातील काही व्यावसायिकांना दिलेल्या सवलतीबाबत समाधान व्यक्त केले. परंतू आजपासून अन्य उर्वरीत व्यावसायिकांना व्यवसायासाठी सुट बहाल करावी व बाजारपेठ पूूर्णतः पुर्ववत सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी केली. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता व्यापारी बांधव प्रशासनाने दिलेल्या सर्व अटी व शर्थीचे निश्‍चीतपणे पालन करतील, अशी ग्वाही दिली. लग्नसराईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. प्रशासनाने कौटुंबिक वातावरणात लग्न सोहळ्याकरिता परवानगी बहाल केली. परंतू लग्नसोहळ्याकरिता लागणा-या दागदागिन्यांसह अन्य वस्तूंची खरेदी करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर अडचणी उद्भवत आहेत, असे निदर्शनास आणून उर्वरीत सर्व छोटया-मोठ्या व्यावसायिकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत व्यापाराकरिता पुर्णतः मुभा बहाल करावी, अशी जोरदार मागणी केली. खा.जाधव यांनीही या व्यापा-यांच्या म्हणण्याचे भक्कम असे समर्थन केले. याप्रसंगी व्यापा-यांच्या या सर्व मागण्यांची प्रशासनाद्वारे निश्‍चीतच सकारात्मक दखल घेतली जाईल. या संदर्भात काही तासातच आदेश सुध्दा काढला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी श्री मुगळीकर यांनी व्यापा-यांना दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या