💥परभणी जिह्या शेजारच्या नांदेड व बीडला जिल्ह्यांना कोरोनाचे सातत्याने हादरे सुरुच...!


💥आज सोमवार दि.२२ जुन रोजी नांदेडात १२ तर बीड मध्ये ४ रुग्ण कोरोनाग्रस्त💥

दिनेश चौधरी/परभणी
-------------------------

परभणी [दि.२२ जुन] - जिल्ह्याच्या शेजारील नांदेड व बीड जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून एकामागून एक हादरे देण्याची शृंखला आजही कायम ठेवली आहे.आज सोमवारी २२ रोजीनांदेडात १२ तर बीड मध्ये ४ रुग्ण कोरोनाग्रस्त अल्याचे अवहाल संबंधित जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले आहेत.नांदेडची रुग्ण संख्या ३१७ वर तर बीड जिल्ह्यातील रुग्ण संख्या ११० वर पोहचली आहे. 


    बीड जिल्हा रुग्णालयास सोमवारी (दि.२२) आणखी चार नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे.सोमवारी ६७ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.यातील ६३ नमुने निगेटिव्ह आले असून ४ पॉझिटिव्ह आले आहेत. सर्व कोरोनाग्रस्त रुग्ण हे छोटी राज गल्ली येथील रहिवाशी आहेत. यामध्ये ३० वर्षीय स्त्री,३८,२७ वर्षीय पुरुष व १० वर्षीय मुलाचा समावेश असून आता बीड जिल्ह्यात  उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ च्या घरात गेली आहे.


तर नांदेड जिल्हा रुग्णालयास प्राप्त झालेल्या अवहालानुसार आज १२ रुग्णांचा अवहाल प्राप्त झाला असुन त्यात गाडीपुरा येथिल ४० वर्षीय ईसम,रेहमतनगरात २२ वर्षीय तरुण,बिलाल नगरात एक ३७ व दुसरा ५७ वर्षीय ईसम,तर पिरबु-हाण येथिल २६,२९,३१ वर्षीय ३ जणं, भगतसिंग नगर भागात ५८ वर्षीय १ पुरुष, नांदेड पिंपळगाव येथिल १८ व ३८ वर्षीय दोन महीला ,रिसनगाव येथिल एक १९ वर्षीय तरुणी,चिखलभोसी येथिल ४५ वर्षीय महीला असे १२ रुग्णांना कोरोनाची लागणं झाल्याचा निर्वाळा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भोसीकर यांनी दिला आहे.तर नांदेड श्री गुरुगोविंदसिह कोवीड सेंटर येथे उपचार घेत असलेल्या १९ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.३१७ पैकी १७ जणांचा मृत्यू झाला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या