💥मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला राज्यपालांची आडकाठी...!
💥१० लाख विद्यार्थ्यांना कोरोना झालाच तर जबाबदारी, परीक्षा घेण्याचा अट्टाहास असलेले राज्यपाल स्वतः घेतील का ?💥

राज्यातील कोरोनाचा संसर्ग पाहून अंतिम वर्षातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थी खूश झाले होते. त्यात राजकारण करुन राज्यपालांनी त्याला विरोध केला.
त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वटहुकूम जारी करून हे वर्ष अपवादात्मक वर्षं म्हणून जाहीर करावे. तसेच सर्वच राज्यातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना तसेच एटीकेटी, बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनादेखील सरसकट उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार न करणाऱ्या राज्यपालांची पदावरून हकलपट्टी करावी, अशी मागणी विद्यार्थी भारती छात्र संघटनेच्या राज्य अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केली आहे.१० लाख विद्यार्थ्यांना कोरोना झालाच तर त्याची जबाबदारी, परीक्षा घेण्याचा अट्टाहास असलेले राज्यपाल स्वतः घेतील का? असा सवाल विद्यार्थी भारतीचे राज्य कार्याध्यक्ष प्रणय घरत यांनी उपस्थित केला.

राज्यपालांना आपल्या हिताचा विचार करायचा नसेल. तर त्यांना पदावरून काढून टाकण्याच्या मागणीसाठी ‘#राज्यपालहटवामहाराष्ट्र_वाचवा’ ही मोहीम राबवावी लागेल, असे राज्यसचिव जितेश पाटील यांनी म्हटले आहे.कोरोनाच्या काळातही परीक्षा घेतल्या गेल्या, तर विद्यार्थी भारतीतर्फे राज्यपालांच्या बंगल्यावर “झोप मोड आंदोलन” देखील करण्यात येईल. तसेच परीक्षांवरही बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा देखील मंजिरी धुरी यांनी दिला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या