💥नांदेड गुरुद्वारा बोर्डातील हाऊसकिपींग कर्मचाऱ्यांना तात्काळ वेतन देण्याची पत्राद्वारे मागणी...!



💥निवेदनात भारती श्रम मंत्रालयाने जारी केलेल्या 20 मार्च 2020 च्या आदेशाचा संदर्भ देण्यात आला आहे💥

नांदेड (दि.१३जुन) गुरूद्वारा येथील हाऊसकिपींगचे काम करणारे विविध कामगार आणि सुपरवाझर यांनी भारती असोसिएशन हाऊसकिपींग कंपनी पुणे यांना पत्र पाठवून सर्वांचे मे महिन्याचे वेतन देण्याचे निवेदन केले आहे. या निवेदनात भारती श्रम मंत्रालयाने जारी केलेल्या 20 मार्च 2020 च्या आदेशाचा संदर्भ देण्यात आला आहे. नसता आपल्या विरुध्द न्यायालयात दाद मागू असेही सुचविण्यात आले आहे.


गुरुद्वारा येथील साफसफाई ते सर्वच प्रकारचे काम करण्याचे कंत्राट भारती असोसिएशन हाऊसकिपींग कंपनी पुणे यांच्याकडे आहे. दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, आम्ही सर्व जण कंपनीच्या नांदेड गुरूद्वारा शाखेमध्ये सुपरवाझर, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, कारपेंटर, लिफ्टमन, वकर असे एकूण 165 ते 170 जण कर्मचारी कार्यरत आहोत. दि.2 जून रोजी एक नोटीस पत्र पाठविण्यात आले आहे त्यात कोरोना लॉकडाऊन असल्यामुळे विविध यात्रीनिवासांमध्ये माणसे येत नाहीत आणि यात्रे निवास बंद आहेत म्हणून पगार दिलेली नाही.सध्या प्रशासनाने अनेक यात्रीनिवास आपल्या ताब्यात घेतले असून तेथे कोविड केअर सेंटर कार्यरत आहे. 2 जून रोजी पाठविलेल्या पत्रात 40 कामगारच कार्यरत राहावेत असे आदेश दिले आहेत. तरीपण आम्ही सर्वांनी संपुर्ण मे महिना काम केले आहे. तो पगार आम्हाला देण्यात यावा. श्रम मंत्रालयाने 20 मार्च रोजी जारी केलेल्या आदेशात कोणत्याही शासकीय, निमशासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांची पगार लॉकडाऊन काळात रोखण्यात येवू नये असे आदेश आहेत.

सोबतच तुळजापुर येथील सुरक्षा कर्मचारी व साफसफाई कर्मचाऱ्यांनी आपले रोखलेले वेतन मिळविण्यासाठी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे याचिका दाखल केली आहे. त्यात सुध्दा कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात येवू नये असे आदेश आहेत. तेंव्हा आमचे मे महिन्याचे वेतन देण्यात यावे नसता आम्ही याबद्दल न्यायालयात धाव घेवू असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सुपरवाझर जगदिपसिंघ नंबरदार, गुरबचनसिंघ अरोरा, दिपसिंघ गाडीवाले, श्रीहरी पाठक, देवासिंघ सपुरे, तेजपालसिंघ नबाब, अरविंदरकौर खुराणा, नरेंद्रपालसिंघ महाजन, ईश्र्वरसिंघ सेना, गुरूसेवकसिंघ कारागिर, गुरमितसिंघ सरदार, वीजतंत्री गुरमितसिंघ संधु, नवनिहासिंघ बुंगई, हरप्रितसिंघ दरोगा, अजितसिंघ पाटनूरवाले आदींसह असंख्य कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या