💥गंगाखेड येथील गंगाखेड-परभणी रोडवरील भुसार दुकानास लागली आग...!💥भीषण आगीत दुकानातील जवळपास 1 हजार 500 क्विंटल कापुस, दुकानाचे शेड व फर्निचर जळून खाक💥 

गंगाखेड (दि.०७ जुन) - येथिल परभणी  रस्त्यावर असलेल्या एका भुसार  दुकानास आज रविवारी दि.०७ रोजी दुपारी ०३-०० वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून दुकानातील जवळपास 1 हजार 500 क्विंटल कापुस, दुकानाचे शेड व फर्निचर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली..

      गंगाखेड शहरातील व्यापारी चंद्रकांत सोपानराव काळे यांंचे माऊली ट्रेनिंग कंपनी भुसार मालाचे दुकान गंगाखेड परभणी रस्त्यावर आहे. त्यात कापूस, गहू, ज्वारी आदीं शेतमालाची खरेदी-विक्री होते. रविवारी ७ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याची बाब काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आली. घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी गंगाखेड नगरपालिका अग्नीशामक सह खाजगी सहा टँकरला बोलावले वेळीच ही यंत्रणा धावून आल्याने. आग आटोक्यात आणली. शाँटसर्किंटमुळे ही आग लागली असल्याचा प्रार्थमिक अंदाज व्यक्त होत आहे. आगीत जवळपास 1 हजार 500 क्विंटल कापुस, दुकानाचे शेड व फर्निचर जळून खाक झाल्याने लाखों रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक काळे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या