💥बौद्धावरिल अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या ग्रहम़त्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा..... किरण घोंगडे



💥रिपब्लिकन सेनेचे औंढा तहसील कार्यालयासमोर जोडोमारो आंदोलन💥

हिंगोली/औंढा ना.प्रतिनिधी /बौद्ध मागासवर्गीय समाजावरील हल्ले रोखण्यासाठी अकार्यक्षम ठरलेले राज्याचे ग्रहम़त्री यांनी राजिनामा द्यावा या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख किरणभाऊ घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय औंढा ना.समोर  महाराष्ट्र ग्रहम़त्री यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडेमारुन निषेध आंदोलन करण्यात आले, या सरकारच्या विरोधात प्रंचड घोषणाबाजी केली व मुख्यमंत्री यांच्या नावाने निवेदन औंढा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मार्फत पाठवण्यात आले पुढे निवेदनात नमुद केले की,पुरोगामी राज्यात प्रतिगामी लोकांनी व जातियव्यवस्थेने थैमान घातले आसुन दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सर्वाधिक हल्ले,खुन,बलात्कार बौद्ध व मागासवर्गीय समाजावर झाल्याची नोंद आहे.दररोज कुठे ना कुठे हल्ले होत आहे.


बिड जिल्ह्यात पारधी तिहेरी हत्याकांड, जळगाव जिल्ह्यातील भडगाव बौद्ध वस्तित घुसुन जबर मारहाण केल्याची घटना घडली, हिंगोली जिल्ह्यातील हिंगणी येथील बौद्ध विहारावर हल्ला, कनेरगाव नका येथे कांबळे कुटुंबाला गंभीर मारहाण, तसेच नांदुसां गावातील लहान मुलींची निर्घृणपणे हत्या, एकांबा येथील निळा झेंडा पाडुन बौद्ध युवकांना मारहाण,परभणी जिल्ह्यातील साळापुरी येथे युवकांना मारहाण, पिंपरी चिंचवड तालुक्यातील पिंपळे सौदागर येथील विराज जगताप यांची निर्घृण हत्या तर नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील पिंपळदरा या गावातील बौद्ध युवक अरविंद बनसोड या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीचे पदाधिकारी मयुर बंडोपंत उमरकर यांनी मारहाण करून विष पाजुन मारले परंतु सदरील विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादीचे राज्याचे ग्रहम़त्री श्री.अनिल देशमुख सदरील आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खुनाचा गुन्हा दाखल करण्या एवजी राजकीय दबाव वापरुन आत्महत्या केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. तेंव्हा ग्रहम़त्री ये पक्षपात व जातियवाद्यी व्रतिना खतपाणी घालुन बौद्ध, मागासवर्गीय समाजावर सत्तेचा वापर करुन अन्याय करत आहेत, त्यामुळे जातियव्यवस्थेचे धनी आसलेले राज्याचे ग्रहम़त्री अनिल देशमुख यांचा राजिनामा घ्यावा व विधानपरिषदेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी फेसबुक लाईव्ह वरुन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांना धमकावत आहेत ते निषेधार्थ आहे. तेंव्हा निषक्रिय ग्रहम़त्री यांचा राजिनामा घेऊन राज्यातील बौद्ध, मागासवर्गीयावर होणाऱ्या हल्लाला प्रतिबंध घालावा व हल्लेखोरांना कठोर शासन करावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जोडेमारे आंदोलनात करण्यात आली या वेळी जिल्हाप्रमुख किरण घोंगडे, अकाश सुतारे, गोरख खिल्लारे, सुनील खंदारे, मनोज मुळे,राजेश खंदारे, यशवंतराव साळवे,दिलिप लोणकर, पप्पू गायकवाड, संदिप खिल्लारे, भगवान खिल्लारे, विजय जाधव, चंद्रकांत मुळे,प्रविण मुळे,अविनाश खिल्लारे, अविनाश खाडे,सचिन खिल््लारे,खंडु खिल्लारे, सिद्धार्थ खिल्लारे,नागनाथ घोंगडे, ग्यानबा घोंगडे आदि उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या