💥धक्कादायक;नांदेडमध्ये कोरोनाचा गुणाकार..!* रुग्ण संख्या ३७८...!💥आज मंगळवारी ३० रोजी सकाळी ४ व सायं १२ रुग्ण आढळले,नांदेडसाठी धोकादायक ठरतोय अनलाॅक-१💥

नांदेड/परभणी (दि.३० जुन) प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यात धक्कादायक रित्या आपला कोरोनाने गुणाकार सुरू केला असुन मंगळवारी ३० रोजी सकाळी ४ व सायं १२ रुग्ण आढळल्याने जिल्हाप्रशासनही हादरले असुन नांदेडकरांसाठी  अनलाॅक-१ धोकादायक तर ठरत नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

         कोरोनाने राज्यात आपली एन्ट्री मारल्यावर नांदेड जिल्हा कोरोना बाधीतांपासुन एक ते दिड महीना दुर होता.परंतु मागील एक ते दिड महिन्यात कोरोनाने या नंदीग्राम नगरीसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाळेमुळे रुजवली जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यापर्यत एन्ट्री मारली असुन आजपर्यंत जिल्ह्यात ३८७ जणांना कोरोनाने ग्रासले आहे.आत्तापर्यंत एकूण संशयित - ६२६७,एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- ५८०६ क्वारंटाईन कालावधी पूर्ण - ३५२४ अजून निरीक्षणाखाली असलेले १६१,पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये ८३,घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - ५७२३ रुग्णांची नोंद आहे परंतु मागील काही दिवसांपासून  कोरोना संक्रमणाचा वाढता गुणाकार पाहुन प्रशासनही चक्रावले आहे..
       

जिल्ह्यातील नामदार,आमदार,मा.महापौर, नगरसेवक,पोलीस,डाॅक्टरही यातुन सुटले नाहीत..
आज तर नांदेड मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला मंगळवारी३० रोजी सकाळी ४ रुग्ण आढळून आले तर लगोलग सायं एकुण १२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांनी दिली. मागील महिन्यापासून नांदेड शहरासह जिल्ह्यात अनलाॅक-१ फेस सुरू करण्यात आला आहे.नागरिक अनेक ठिकाणी बाजारात गर्दी करताना दिसत आहेत.कोणतीही चौकशी नाही जिल्ह्यात परराज्यासह परजिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत बाजारात ग्राहकांसह व्यापारीही तोंडावर मास्क न बाळगता वावरत आहेत यामुळे तर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे जाणकार सांगत आहेत..यावर जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलने आता गरजेचे झाले आहे.
----------------------------------------------------------------
💥१२ नवीन रुग्णांचा तपशील💥

नांदेड शहर बाफना परिसर २८ व ६४ वर्षीय पुरुष, डॉ आंबेडकर नगरातील ५ वर्षीय बालीका व ३३ वर्षीय पुरुष,आसरजन येथिल ३७,१०,११ वर्षीय महीला व एक ४२ वर्षीय पुरुष तर विनायक नगरातील ३४ वर्षीय महीला,वसंतनगरातील ५२ वर्षीय पुरुष, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथिल एक ३८ वर्षीय महीला व एक २० वर्षीय तरुण असे एकूण १२ रुग्णांचे अहवाल पाझीटीव्ह आले असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या