💥वसमत तालुक्यात महामार्गाच्या कामांमुळे पाणी अडून शेतीचे बरेच नुकसान...!



💥हिंगोली जिह्याचे खा.हेमंत पाटील धावले शेतकऱ्यांच्या मदतीला,शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची केली मागणी💥

हिंगोली प्रतिनिधी 

हिंगोली (दि.१४ जुन) : वसमत तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे कोर्टा आणि चोंढी या गावांजवळ पावसाचे पाणी अडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये हजारो हेक्टर वरील सोयाबीन हळद पिकांचेही नुकसान झाले आहे .

 नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना  तात्काळ  नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी  खासदार हेमंत पाटील यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडे केली आहे तसेच हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना या भागातील शेती व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत . 
यावेळी कुरूंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपीनवार, मंडळ अधिकारी , तलाठी यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थिती होते .
      मागील तीन दिवसापासून राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे..जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून काही भागात पेरणीसुद्धा झाली आहे . हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात सुद्धा शेतकऱ्यांनी खरीप पिक सोयाबीन व हळद पिकाची लावणी केली होती.
 तालुक्यातील चोंढी व  कोर्टा या भागातून राष्ट्रीय महामार्ग जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरु आहेत. यामुळे काही ठिकाणी पुलाच्या कामामुळे पावसाचे पाणी अडून हजारो हेक्टर जमीनीवर शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन, कापूस , हळद पीक वाहून गेले आहे. पहिल्याच मोठया पावसात रस्त्याच्या अर्धवट राहिलेल्या कामांमुळे पाणी अडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकासोबतच  महामार्गालगत असलेली सुपीक जमीन खरडून गेली आहे..त्यामुळे जमिनीचा पोत बिघडून पिकांचे नुकसान झाले आहे तर काही भागात पाणी साचल्याने गाळ जमा होऊन सुद्धा पिकांचे नुकसान झाले आहे.
याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी चोंढी व कोर्टा भागाचा दौरा करून पाहणी केली .  नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देऊन दुबार पेरणीचे संकट दूर करावे अशी मागणी  महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडे केली आहे. तसेच हिंगोली जिल्हाधिकऱ्याना या भागाचे पंचनामे करून नुकसान भरपाई तातडीने मिळवून देण्यासाठी उपाययोजना करावी असे निर्देश दिले आहेत  . महामार्गाच्या प्रलंबित राहिलेल्या कामामुळे येत असलेल्या अडचणींचा पाढाचं यावेळी उपस्थित शेतकरी बांधवानी खासदार हेमंत पाटील यांच्यासमोर वाचून दाखविला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या