💥नांदेड मध्ये ४ कोरोना संशयीतांचे अहवाल आले पॉझिटिव्ह यात एका माजी महापौरासह नगरसेवकाचा समावेश...!


💥जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली ३०८💥 
नांदेड (दि.२१ जुन) :- येथील शासकीय रुग्णालयात आज रविवार दि.२१जुन रोजी दिवसभराच्या काळात कोरोनाने विश्रांती दिल्यानंतर रात्री ०८-०० वाजेच्या सुमारास ४ कोरोना संशयीतांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये एक नांदेड मनपाचे माजी महापौर व नगरसेवकाचा समावेश आहे.
आज रविवारी सायं.०५-०० वाजेपर्यंत ३५ अहवाल तपासण्यात आले. तर रात्रीच्या वेळी १४ अहवाल आले आहेत.यामध्ये ०९ अहवाल निगेटिव्ह आले.एक अहवाल अनिर्णित आले तर ४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
चार जणांमध्ये सर्वांच्या सर्व जण हे पुरुष आहेत. धोबी गल्ली एक,रहेमत नगर एक व बिलाल नगर येथील दोघा जणांचा यात समावेश आहे.
बिलाल नगर येथील जे दोन रुग्ण आढळले आहेत.यामध्ये माजी महापौर व त्यांच्या कुटूंबातील एका नगरसेवकाचा समावेश आहे. माजी महापौर असलेले ५७ वर्षीय व्यक्ती ही अनेक वर्षांपासून महानगरपालिकेच्या सभागृहात सदस्य राहिली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३०८ झाली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या