💥नांदेड येथील खाजगी रुग्णालयांनी गाठला निर्दयीपणाचा कळस,गरोदर महिलेला हाकलले रुग्णालया बाहेर...!💥यात्री निवास परिसरात प्रसुतीपुर्व वेदनेने तडफडणाऱ्या हिंदु बहिणीच्या मदतीला धावले सिख धर्मीय भाऊ💥

नांदेड (दि.०९ जुन) - येथील महाराजा रणजीतसिंघजी यात्री निवास परिसरात एक गरोदर महिला रस्त्यावर प्रसुतीपुर्व वेदनेने अक्षरशः तडफडत असून सदरील महिले सोबत अत्यंत वृध्द आई-वडील असून ते हतबल झाल्याचा भ्रमनध्वनी एमईसीबी गुरुद्वारा विभागाचे  कर्मचारी सरदार भगतसिंघ गाडीवाले,राहुल स्वर्णकार,
किशोर परदेशी यांनी येथील शिवसेनेचे स्थानिक नेते तथा सामाजिक कार्यकर्ते सरदार अवतारसिंघ पहरेदार यांना काल सोमवार दि.०८ जुन २०२० रोजी मध्यरात्री ०३-०० वाजेच्या सुमारास आला भर झोपेत असल्याने भाई अवतारसिंघजी यांनी क्षणाचाही विलंब न करता घटना स्थळ गाठले.

यावेळी यात्री निवास समोरील रस्त्यावर त्यांना गरोदर महिला प्रसुतीपुर्व वेदनेने अक्षरशः तडफडत असल्याचे व असहाय्य वृध्द आई-वडील तिला घेऊन बसलेले पाहून त्यांना फार वाईट वाटले त्यांनी सोबत असलेल्या वृध्दास विचारपूस केली असता त्यांना असे निदर्शनास आले की गरोदर महिला व सोबत असलेले तिचे आई-वडील हे नरसी येथील रहिवासी असून शेतकरी कुटुंबातील आहेत.सदरील वृध्द शेतकरी व त्यांची पत्नी आपल्या गरोदर मुलीला प्रसुतीसाठी याच परिसरातील खुरसाळे हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात घेऊन आले होते परंतु कदाचित कोरोना व्हायरस या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेदनेने तडफडणाऱ्या गरोदर महिलेला यत्किंचितही मानुसकीची भावना न दाखवता तिची प्रसुती व तिच्यावर उपचार तर केलेच नाही उलट या वेदनेने तडफडणाऱ्या गरोदर महिलेसह तिच्या वृध्द आई-वडिलांना सुध्दा रुग्णालया बाहेर अक्षरशः ढकलून रुग्णालयाच्या गेटला कुलूप लावल्याचा माणवतेला काळीमा फासण्याचा प्रकार केल्याचे त्यांनी सांगितले मध्यरात्रीच्या सुमारास हे वृध्द शेतकरी दाम्पत्य आपल्या प्रसुतीपुर्व वेदनेने तडफडणाऱ्या मुलीला भर रस्त्यावर तब्बल एक तास घेऊन बसले परंतु संबंधित खाजगी रुग्नालयातील लोकांना त्यांची यत्किंचितही दयामया आली नाही.
  सदरील घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटना स्थळावर एखाद्या देवदूता प्रमाणे मदतीला धावून गेलेले सरदार अवतारसिंघ पहरेदार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गुरुद्वारा बोर्डातील सेवादार (कर्मचारी) सरदार अमनदीपसिंघ शाह यांना गुरुद्वारा बोर्डाची अँब्यूलन्स घेऊन येण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स.अमनसिंघ हे तात्काळ अँब्यूलन्स घेऊन घटना स्थळावर पोहोचले आणि त्या पीडित महिलेसह तिच्या आई-वडिलांना सरकारी दवाखाण्यात नेऊन गरोदर महिलेला विष्णूपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केले.
अश्या प्रकारे एका अनोळखी हिंदु बहिणीच्या मदतीला एखाद्या देवदूता प्रमाणे सिख धर्मीय भाऊ स.अवतारसिंघ पहरेदार,स.अमनदीपसिंघ व घटने संदर्भात भ्रमणध्वनी वरून माहिती देणारे स.भगतसिंघ गाडीवाले हे धावून येवून त्यांनी मानुसकीचे नाते जोपासले त्यांच्या या मानुसकीचे नाते जोपासनाऱ्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या